IPL 2026 Auction : आयपीएल २०२६ च्या हंगामासाठी १० फ्रँचायझी संघ १६ डिसेंबरला मिनी लिलावात उतरणार आहेत. अबूधाबी येथे पार पडणाऱ्या लिलावासाठी देश विदेशातील १३०० पेक्षा अधिक खेळाडूंनी नाव नोंदणी केली होती. यातून फ्रँचायझीच्या पसंतीनुसार फक्त ३५० नावांची अंतिम यादी तयार करण्यात आली होती. आता या यादीत पुन्हा मोठा बदल करण्यात आला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
लिलावात सामील खेळाडूंची अंतिम यादीत पुन्हा बदल
BCCI नं मिनी लिलावासाठी जी अंतिम यादी जाहीर केली होती त्यातून ९ खेळाडूंची नावे चुकून गायब झाली होती. हा घोळ लक्षात येताच बीसीसीआयने पुन्हा एकदा नव्याने यादी जाहीर केली आहे. चूक दुरुस्त करताना अंतिम यादीत ९ खेळाडूंच्या नावाची भर घालण्यात आली असून आता मिनी लिलावातील एकूण खेळाडूंची संख्याही ३५९ एवढी ढाली आहे.
IPL 2026 Player Auction Full List : १००० खेळाडूंचा पत्ता कट; फायनल यादीत 'या' स्टार क्रिकेटरची सरप्राइज एन्...
विराट-क्रिससह या खेळाडूंची नावे झाली होती गायब
नव्या यादीत ज्या नऊ खेळाडूंच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. यात गत IPL चॅम्पियन RCB च्या ताफ्यातून दिसलेला स्वास्तिक चिकारासह यंदाच्या मिनी लिलावात एसोसिएट देशांतील एकमेव मलेशियन क्रिकेटपटू वीरनदीप सिंहच्या नावही आहे. याशिवाय अन्य खेळाडूमध्ये त्रिपुराचा अष्टपैलू मनीषंकर मुरासिंह, चामा मिलिंद (हैदराबाद), केएल श्रीजीत (कर्नाटक), एथन बॉश (दक्षिण अफ्रीका), क्रिस ग्रीन (ऑस्ट्रेलिया), राहुल राज नमला (उत्तराखंड) आणि विराट सिंह (झारखंड) या खेळाडूंचा समावेश आहे.
मोठी चूक अन् सुधारणा
याआधी जाहीर करण्यात आलेल्या यादीत BCCI नं दिल्लीत जन्मलेल्या निखिल जौधरी याच्या नावाचा समावेश भारतीय अनकॅप्ड खेळाडूच्या यादीत केला होता. पण हा खेळाडू मूळचा भारतीय असला तरी तो आता ऑस्ट्रेलियात स्थायिक झाला असून तो तिथेच देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याचे नाव आता अनकॅप्ड परदेशी खेळाडूंच्या गटात टाकण्यात आले आहे.
१० फ्रँचायझी ३५९ खेळाडू आणि ७७ जागा
नव्या यादीनुसार आता मिनी लिलावाच्या वेळी १० फ्रँचायझी संघ ३५९ खेळाडूंवर बोली लावताना दिसतील. यात २४७ भारतीय तर ११२ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. लिलावात फक्त ७७ स्लॉट भरायचे आहेत. यात ३१ जागा परेदशी खेळाडूंसाठी आहेत. कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन फ्रँचायझी संघाच्या पर्समध्ये सर्वाधिक रक्कम आहे. दोन्ही फ्रँचायझी संघ अनुक्रमे ६४.३० आणि ४३.४० कोटी रुपयांच्या पर्ससह लिलावात उतरतील.