BCB Removes Nazmul Islam As Director : बांगलादेश क्रिकेट बोर्डाने भारतीय मैदानातील टी-२० वर्ल्ड कपचे सामने दुसऱ्या देशात खेळवण्याची मागणी केल्याचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे. यासंदर्भात BCB नं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला दोन पत्रे लिहिली आहेत. या मुद्यावरील तोडगा निघण्याआधी आता बांगलादेश क्रिकेटमध्ये मोठा भूकंप झाला आहे. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतून माघार घेतल्यावर आम्हाला काहीच फरक पडणार नाही, अशा तोऱ्यात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नजमुल इस्लाम यांना बांगलादेश क्रिकेट बोर्डाने मोठा दणका दिला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
बांगलादेशच्या खेळाडूंनी बहिष्काराचं हत्यार उपसले अन्...
बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) नजमुल इस्लाम यांची आर्थिक समितीच्या प्रमुख पदावरून हकालपटी केली आहे. भारत-बांगलादेश यांच्यात निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीत बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (BCB) संचालक पदावर कार्यरत असताना नजमुल इस्लाम यांनी एक वादग्रस्त विधान केले होते. माजी कर्णधार तमीम इकबाल याला भारतीय एजंट असे संबोधले होते. या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. सर्व खेळाडूंनी एकत्र येत BPL वर बहिष्कार टाकला अन् त्यानंतर अखेर BCB ने नजमुल इस्लाम यांच्यावर कठोर कारवाई केली आहे.
"मुस्तफिजूर रहमानशी माझा काय संबंध?"; IPL 2026 वरच्या प्रश्नावर मोहम्मद नबी संतापला...
नजमुल इस्लाम यांना BCB च्या आर्थिक समितीच्या प्रमुखपदावरून हटवले
नजमुल इस्लाम यांनी BCB मध्ये मोठ्या पदावर कार्यरत असताना बेभान वक्तव्य करताना म्हटले होते की, जर बांगलादेशने टी-२० वर्ल्ड कपमधून माघार घेतली, तर त्याचा BCB ला कोणताही आर्थिक तोटा होणार नाही, मात्र खेळाडूंना नुकसान सहन करावे लागेल. कारण त्यांना मॅच फी मिळणार नाही. एवढेच नाही तर भारतात जाऊन टी-२० वर्ल्ड कप खेळण्यासंदर्भात सकारात्मक वक्तव्य करणाऱ्या माजी कर्णधार तमीम इकबाल याला त्यांनी भारताचा एजंट असे संबोधले होते. त्यामुळे बांगलेदश क्रिकेटर्समध्ये संतापाची लाट उसळली होती. बांगलादेशी खेळाडूंनी देशातील बांगलादेश प्रीमियर लीग (BPL) मधील सामने खेळण्यासही नकार दिला. खेळाडूंनी बहिष्काराचे हत्यार उपसल्यावर बोर्डाने खेळाडूंच्या हितासाठी हा निर्णय घेतला आहे.
नेमकं काय घडलं?
बांगलादेशच्या खेळाडूंनी बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये खेळण्यास नकार दिल्यावर BCB चे काही अधिकारी क्रिकेटर्स वेलफेअर असोसिएशन ऑफ बांगलादेशचे अध्यक्ष मोहम्मद मिथुन यांची भेट घेण्यासाठी गेले. मात्र खेळाडूंची मागणी स्पष्ट होती, नजमुल इस्लाम यांना पदावरून हटवले जावे, अशी मागणी करण्यात आली. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्याअधिकृत प्रेस नोटमध्ये सांगण्यात आले आहे की, अलीकडील घटनांचा आढावा घेतल्यानंतर संस्थेच्या हितासाठी नजमुल इस्लाम यांना फायनान्स कमिटीच्या अध्यक्षपदाच्या जबाबदाऱ्यांतून तात्काळ मुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ESPNcricinfo च्या रिपोर्टनुसार, पुढील आदेश येईपर्यंत BCB अध्यक्षच फायनान्स कमिटीचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळतील.