Join us  

BBL Final: विजयाचं भयानक सेलिब्रेशन; Perth Scorchersच्या खेळाडूच्या नाकातून वाहू लागले रक्त अन्... Video 

Perth Scorchers' title-winning celebrations - पर्थ स्कॉचर्स संघानं बिग बॅश लीग २०२२ ( Big Bash League 2022) चे जेतेपद नावावर केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2022 12:17 PM

Open in App

Perth Scorchers' title-winning celebrations - पर्थ स्कॉचर्स संघानं बिग बॅश लीग २०२२ ( Big Bash League 2022) चे जेतेपद नावावर केले. त्यांनी अंतिम सामन्यात सिडनी सिक्सर्सवर ७९ धावांनी विजय मिळवताना चौथ्यांदा BBL ट्रॉफी उचलली. सर्वाधिक BBL जेतेपद पटकाण्याचा मान पर्थ स्कॉचर्सनं पटकावला, परंतु त्यांच्या या आनंदाचे सेलिब्रेशन एवढं भयानक होतं की गोलंदाज झाय रिचर्डसन ( Jhye Richardson) याच्या नावावर मार लागला आणि त्याच्या नाकातून रक्त वाहू लागले.

विजयाचं सेलिब्रेशन करताना रिचर्डसनच्या नाकावर सहकारी खेळाडूचा खांदा लागला आणि त्यामुळे त्याच्या नाकातून रक्त वाहू लागले. रिचर्डसनच्या या दुखापतीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. रक्त वाहत असूनही रिचर्डसनच्या चेहऱ्यावर आनंद होता आणि त्यानं सामन्यानंतर अशा परिस्थितीत मुलाखतही दिली.

प्रथम फलंदाजी करताना पर्थ स्कॉचर्स संघानं २० षटकांत ६ बाद १७१ धावा केल्या. संघाचे आघाडीचे चार फलंदाज २५ धावांवर तंबूत परतले होते. त्यानंतर  कर्णधार अॅश्टन टर्नर व लॉरी एव्हान्स यांच्या अर्धशतकी खेळीनं सिडनी सिक्सर्सच्या गोलंदाजांना हैराण केले. टर्नरनं ३५ चेंडूंत ४ चौकार  व १ षटकारासह ५४ धावा केल्या, तर एव्हान्सनं ४१ चेंडूंत ४ चौकार व ४ षटकारासह ७६ धावांची खेळी केली. सिडनी सिक्सर्सच्या स्टीव्ह ओ'किफ व नॅथन लियॉन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरात सिक्सर्सचा संपूर्ण संघ १६.२ षटकांत ९२ धावांत तंबूत परतला. सिक्सर्सकडून डॅनिएल ह्युजेसनं सर्वाधिक ४२ धावा केल्या. पर्थ स्कॉचर्सच्या ७६ धावांच्या विजयात एव्हान्स चमकला आणि त्याला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार दिला गेला. स्कॉचर्सच्या अँड्य्रू टायनं तीन, झाय रिचर्डसननं दोन विकेट्स घेतल्या.  

टॅग्स :बिग बॅश लीगआॅस्ट्रेलिया
Open in App