Join us

BBL 10 : एकाच चेंडूवर दोनवेळा रन आऊट झाला फलंदाज; पाहा भन्नाट Video 

BBLमध्ये प्रथमच एक फलंदाज एकाच चेंडूवर दोनवेळा धावबाद झाला.

By स्वदेश घाणेकर | Updated: January 24, 2021 15:58 IST

Open in App

बिग बॅश लीगच्या ( Big Bash League) १०व्या पर्वात अॅडलेड स्ट्रायकर्सचा फलंदाज जॅक विथराल्ड एकाच चेंडूवर दोन वेळा धावबाद झाला ( Run out twice off a single ball). सिडनी थंडर्स संघाविरुद्धच्या सामन्यात अॅडलेडच्या डावातील ९व्या षटकात हा प्रकार घडला. विथराल्ड नॉन स्ट्रायकर एंडला होता आणि फिल सॉल्ट स्ट्राईकवर होता. ख्रिस ग्रीनच्या गोलंदाजीवर सॉल्टनं स्ट्रेट ड्राईव्ह मारला आणि तो ग्रीनच्या हाताला लागून नॉन स्ट्रायकर एंडच्या स्टम्पवर आदळला. तेव्हा विथराल्डनं क्रीज सोडली होती आणि तेथे तो प्रथमच रन आऊट झाला. अजून अॅक्शन संपलेली नाही. सॉल्टनं तोपर्यंत धाव घेण्यासाठी क्रीज सोडली होती आणि विथराल्ड ती पूर्ण करण्यासाठी यष्टिरक्षकाच्या दिशेनं धावला. सॅम बिलिंगनं चपळता दाखवत विथराल्डला दुसऱ्यांदा धावबाद केले. अशा प्रकारे BBLमध्ये प्रथमच एक फलंदाज एकाच चेंडूवर दोनवेळा धावबाद झाला.

यानंतर समालोचन करणारे ब्रेंडन ज्युलियन म्हणाले की,''जॅक विथराल्ड, हे तू काय करतोय? याआधी तू अनेकदा धावबाद होता होता वाचलास, पण अखेर यावेळी धावबाद झालास.''

पाहा व्हिडीओ...   

टॅग्स :बिग बॅश लीगटी-20 क्रिकेट