Join us

मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये फलंदाजी सोपी - रविचंद्रन अश्विन

गेल्या वर्षी अश्विनने किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे नेतृत्व केले होते. यावेळी आयपीएलमध्ये तो पहिल्यांदाच दिल्लीकडून खेळेल. त्याने १३९ आयपीएल सामने खेळताना १२५ बळी घेतले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2020 04:36 IST

Open in App

दुबई : ‘माझ्या मते मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये गोलंदाजी करणे कठीण आहे. त्या तुलनेत फलंदाजी करणे अधिक सोपे आहे. माझे काम ७-८ षटकांनंतर सुरू होते. त्यानुसार मी माझी भूमिका चांगल्याप्रकारे समजू शकलो,’ असे दिल्ली कॅपिटल्सचा आॅफ स्पिनर रविचंद्रन अश्विन याने सांगितले. त्याचवेळी त्याने, ‘प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्यासह काम करण्यास उत्सुक आहे,’ असेही सांगितले.गेल्या वर्षी अश्विनने किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचे नेतृत्व केले होते. यावेळी आयपीएलमध्ये तो पहिल्यांदाच दिल्लीकडून खेळेल. त्याने १३९ आयपीएल सामने खेळताना १२५ बळी घेतले आहेत. दिल्लीचे प्रशिक्षक पाँटिंग यांनीही अश्विनचे कौतुक करताना त्याला आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी फिरकीपटू मानले आहे.यंदाच्या मोसमासाठी सज्ज झालेल्या अश्विनने म्हटले की, ‘गेल्या दोन वर्षांत पंजाब संघाकडून खेळल्यानंतर मी माझी भूमिका चांगल्याप्रकारे समजू शकलो. एक फलंदाज म्हणूनही मी माझी भूमिका समजून घेत आहे आणि संघासाठी फलंदाजीतूनही योगदान देऊ इच्छितो. किती धावा काढल्या जातील हे महत्त्वाचे नाही, मात्र हे एक आव्हान आहे जे मला पसंत आहे.’दिल्ली संघाविषयी अश्विन म्हणाला की, ‘दिल्ली संघाविषयी मी खूप ऐकले आहे आणि संघाचे मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग यांच्यासह काम करण्यास मी उत्सुक आहे. गेल्याच आठवड्यात माझी त्यांच्याशी चर्चा झाली. श्रेयस अय्यर शानदार युवा खेळाडू असून त्याच्यासोबतही मी चर्चा केली. संघात युवा खेळाडूंच्या उपस्थितीमध्ये वातावरण ऊर्जात्मक आहे. गेले काही महिने आमच्या सर्वांसाठीच आव्हानात्मक राहिले आणि खेळाडूंचा उंचावलेला आत्मविश्वास पाहणे खूप आनंददायी आहे.मोठ्या कालावधीनंतर मोकळ्या वातावरणात सराव करणे सुखद आहे. स्पर्धेसाठी मी उत्साहित आहे. आम्ही नेट्समध्ये आघाडीच्या स्तरावरील फलंदाजांना गोलंदाजी करत आहोत. यामुळे स्वत:ला पारखून घेण्याची संधी मिळत आहे. सरावाचा हा अनुभव खरेच खूप चांगला आहे.’ (वृत्तसंस्था)

टॅग्स :आर अश्विनआयपीएल 2020