Join us  

न्यूझीलंडचे बार्कले आयसीसी चेअरमनपदी

मनोहर यांचे स्थान घेणार : इमरान ख्वाजा होते हंगामी चेअरमन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 4:40 AM

Open in App

दुबई :  आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या चेअरमनपदी (आयसीसी) न्यूझीलंडचे ग्रेग बार्कले यांची निवड झाली. त्यांनी इमरान ख्वाजा यांचा ११-५ असा पराभव करत निवडणूक जिंकली. २०१२ पासून ग्रेग बार्कले न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष आहेत. तसेच २०१५ मध्ये ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये झालेल्या विश्वचषकाच्या आयोजन समितीचे अध्यक्षपदही त्यांनी भूषावले आहे. त्यांच्या विजयात क्रिकेट द. आफ्रिकेचे मत निर्णायक ठरले.इमरान ख्वाजा जुलै २०२० पासून आयसीसीच्या हंगामी अध्यपदी होते. आयसीसीसी चेअरमन शशांक मनोहर यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याकडे अध्यक्षपद सोपवण्यात आले होते. याआधी २२ नोव्हेंबर २०१५ ते ३० जून २०२० पर्यंत मनोहर चेअरमन  होते. ‘आयसीसीचे चेअरमनपद मिळणे हा माझा बहुमान आहे. या सन्मानासाठी मी माझ्या सर्व सहकाऱ्यांचा आभारी आहे. क्रिकेटचा विकास व उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही प्रयत्न करू. मला आशा आहे की सर्व मिळून कोरोनाविरुद्ध क्रिकेटला पुढे घेऊन जातील,’ असे बार्कले म्हणाले.

बीसीसीआयचा मिळाला पाठिंबाn व्यवसायाने वकील असलेले बार्कले २०१२ पासून न्यूझीलंड क्रिकेट बोर्डात आहेत. आता ते स्वतंत्र कामकाज पाहण्यासाठी न्यूझीलंड बोर्डातीेल पद सोडणार आहेत.n तिमाही बैठकीत १६ संचालकांनी भाग घेतला. त्यात कसोटी खेळणाऱ्या देशांचे पूर्ण १२ सदस्य, तीन असोसिएट सदस्य आणि एक स्वतंत्र महिला संचालक पेप्सिकोच्या इंद्रा नुई यांचा समावेश होता.n आयसीसीच्या नियमानुसार विजयासाठी १६ सदस्य देशांपैकी ११ मते मिळणे अनिवार्य आहे. आयसीसी सीईओ हे बोर्डाचे १७ वे सदस्य आहेत. मात्र त्यांना मतदानाचा अधिकार नाही.n भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया तसेच न्यूझीलंडने बार्कले यांच्या बाजूने मतदान केले असे मानले जात आहे. दुसरीकडे ख्वाजा यांना पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा पाठिंबा होता. सिंगापूर बोर्डाचे प्रमुख आयसीसी स्पर्धा वाढविण्याच्या बाजूने होते.  त्यामुळे सहयोगी देशांचा नफा वाढेल, असा त्यांचा तर्क होता.

टॅग्स :आयसीसीन्यूझीलंड