ठळक मुद्देविराट कोहली सदिच्छादूत म्हणून 175 कोटी रुपये कमावतो.विराट कोहली 19 ब्रँड्सची जाहिरात करतो.त्याची एक जाहिरात मात्र मागे घ्यावी लागली आहे
मुंबई : वाहन चालकांनी वाहतुकीचे नियम काटेकोरपणे पालन करावे यासाठी वाहतुक विभाग कार्यरत आहे. मात्र, उप्तादनाचा खप वाढवण्यासाठी काही कंपन्या जाहिरातीत धोकादायक स्टंट दाखवत आहेत. सरकारने अशा जाहिरातींवर चाप बसवण्यास सुरुवात केली आहे आणि त्यामुळे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला एक जाहिरात मागे घ्यावी लागली आहे.
हीरो मोटो कॉर्पने त्यांच्या Xtreme 200 R या बाईकची जाहिरात करण्यासाठी कोहलीची निवड केली. या जाहिरातीत कोहली तुफान वेगाने Xtreme 200 R बाईक चालवताना दिसत आहे. वाहतुक मंत्रालयाने या जाहिरातीवर बंदी आणण्याच्या सुचना केल्या होत्या. त्यानुसार ती जाहिरात मागे घेण्यात आली. सप्टेंबर महिन्यात ही बाईक लाँच करण्यात आली होती आणि कोहली त्याचा सदिच्छादूत आहे.
कोहली सदिच्छादूत म्हणून 175 कोटी रुपये कमावतो. कोहली 19 ब्रँड्सची जाहिरात करतो.