Join us  

Corona Virus : बांगलादेशच्या क्रिकेटपटूला कोरोनाची लागण, छातीत दुखू लागल्यानं डॉक्टरांकडे धाव

बांगलादेशमधील कोरोना रुग्णांची संख्या ही 16660 इतकी झाली आहे आणि 250 लोकांना प्राण गमवावे लागले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 12:10 PM

Open in App

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही 43 लाख 43,251 वर पोहोचली आहे. त्यापैकी 16 लाख 04,559 रुग्ण बरे झाले असले तरी 2 लाख 92, 913 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. बांगलादेश क्रिकेट संघाचे डेव्हलपमेंट प्रशिक्षक आणि माजी प्रथम श्रेणी क्रिकेटपटू आशिकूर रहमान याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. रहमान यानं बुधवारी याची माहिती दिली आणि त्याला सिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

''मला मंगळवारी वैद्यकिय अहवाल मिळाला आणि त्यात कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले,''असे रहमाननं सांगितले. तो पुढे म्हणाला,''सुरुवातीला मलाही काहीच कळलं नाही. मला टॉन्सिलचा त्रास होतोय, असं वाटलं. सुरुवातीला घशात खवखवलं, त्यानंतर हळुहळू ताप आला आणि त्यानंतर छातीत दुखायला लागलं. त्यानंतर मी डॉक्टरांकडे गेलो.''

रहमानने 15 प्रथम श्रेणी आणि 18 लिस्ट ए क्रिकेट सामने खेळले आहेत. रहमान हा 2002च्या 19 वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेतील बांगलादेश संघाचा सदस्य होता, परंतु त्याला वरिष्ठ संघात स्थान पटकावता आले नाही. रहमाननं प्रथम श्रेणी आणि लिस्ट एक क्रिकेटमध्ये अनुक्रमे 36 व 21 विकेट्स घेतल्या आहेत. 33 वर्षीय रहमान हा बांगलादेश महिला संघाचा सहाय्यक प्रशिक्षकही होता.

आत्मनिर्भर भारत'; पंतप्रधान मोदींचा अखेरच्या चेंडूवर षटकार; बबिता फोगाटचं ट्विट व्हायरल

... तर हार्दिक पांड्याला 10 वाजता ड्रिंक्ससाठी घेऊन गेलो असतो; रवी शास्त्रींना Yuvraj Singhचा सल्ला

टीम इंडियाच्या प्रशिक्षकाच्या क्षमतेवर Yuvraj Singhचा सवाल; त्या दर्जाचे क्रिकेट ते खेळलेत का?

'माझ्या घरावर दगडफेक करण्यात आली होती'; तो प्रसंग आठवून युवराज सिंग भावुक

 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्याबांगलादेश