Join us

"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ

बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 18:14 IST

Open in App

ऑस्ट्रेलियात राहत असलेल्या बांगलादेशी महिला क्रिकेटर जहांआरा आलम हिने केलेल्या गंभीर आरोपानंतर क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे. याआधी महिला टीम कॅप्टन निगार सुल्ताना हिच्यावर टीमच्या खेळाडूंना मारहाण केल्याचा आरोप लागला होता आणि आता बांगलादेशचे माजी सिलेक्टर आणि महिला टीमचे मॅनेजर राहिलेले मंजरुल आलम यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप झाला आहे. २०२२ च्या महिला वर्ल्ड कपमध्ये मंजरुल यांनी अश्लील संवाद केला. तो तिला आणि इतर महिला क्रिकेटपटूंना जबरदस्तीने मिठी मारत असे, नेहमी शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता. इतकेच नाही तर अनेकदा तिला अश्लील प्रश्न विचारत असे, अगदी तिच्या मासिक पाळीबद्दलही विचारत असे असा दावा जहांआरा आलमने केला आहे.

जहांआरा आलम हिने आरोप केला की, मी बोर्डाच्या अधिकाऱ्यांकडे मंजरूल आलम यांच्या वर्तवणुकीबाबत तक्रार दाखल केली होती, पण कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. आता पत्रकार रियासाद अझीम यांच्या मुलाखतीत आलमने सार्वजनिकरित्या हे आरोप केल्याने बांगलादेश क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. दोषी आढळणाऱ्या कोणालाही, मग तो संचालक, प्रशिक्षक, कर्मचारी किंवा प्रभावशाली व्यक्ती असो त्याला सोडणार नाही. लैंगिक छळाबाबत बोर्डाचे धोरण झीरो टोलरंस आहे असं त्यांनी म्हटलं आहे. दुसरीकडे मंजरुल आलम यांनी त्यांच्यावरील आरोप निराधार आणि बनावट असल्याचे फेटाळून लावले आहेत. 

जहांआरा आलम यांचे आरोप काय?

पत्रकार रियासाद अझीम यांना दिलेल्या मुलाखतीत जहांआरा आलम म्हणाल्या की, "मी एकदा नाही तर अनेक वेळा या अश्लील कृत्याचा सामना केला आहे. खरं तर, जेव्हा आम्ही संघात असतो तेव्हा आम्ही इच्छा असूनही अनेक गोष्टींबद्दल बोलू शकत नाही. जेव्हा पोटापाण्याचा विषय असतो, तेव्हा तुम्हाला बऱ्याच गोष्टी माहिती असतात, ज्याबाबत तुम्ही काहीही बोलू शकत नाही, ना तुम्ही त्याचा निषेध नोंदवू शकत नाही. २०२२ च्या महिला विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान झालेल्या कथित लैंगिक छळाचा तिने विशेषतः उल्लेख केला. त्यावेळी मंजरुल आलम महिला क्रिकेट संघाचे मॅनेजर होते. 

त्याशिवाय, एकदा मंजरुल आलम माझ्या खूप जवळ आले. माझा हात धरला आणि खांद्यावर एक हात ठेवून कानाजवळ येऊन विचारले - तुला मासिक पाळी येऊन किती दिवस झाले असा जहांआराने आरोप केला. ही आलमची सवय आहे. तो मुलींना त्याच्याकडे ओढायचा. तो त्यांना छातीजवळ मिठी मारायचा. तो त्यांच्या कानाजवळ उभे राहून त्यांच्याशी बोलत असे. मुली आलमला घाबरायच्या. त्या त्याच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करत असत. सामन्यात हस्तांदोलन करताना त्या दूरवरून त्याच्याकडे हात पुढे करत असत जेणेकरून तो त्यांना त्याच्याकडे ओढू नये असा आरोप जहांआरा आलम हिने केला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bangladeshi cricketer accuses ex-manager of sexual harassment during World Cup.

Web Summary : Bangladeshi cricketer Jahanara Alam accuses ex-manager Manjarul Alam of sexual harassment during the 2022 World Cup. She reported the incidents, but no action was taken. The cricket board has ordered an investigation, promising zero tolerance. Manjarul denies allegations.
टॅग्स :बांगलादेशऑफ द फिल्ड