'जखमी वाघ' रचिन रविंद्रनं कमबॅक मॅचमध्ये रचला इतिहास; ICC स्पर्धेत मारला शतकी 'चौकार'

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकवण्याचा खास विक्रम आता रचिन रवींद्रच्या नावे झाला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 21:39 IST2025-02-24T21:35:39+5:302025-02-24T21:39:49+5:30

whatsapp join usJoin us
Bangladesh vs New Zealand 6th Match Rachin Ravindra Record First ICC Champions Trophy Century And Most 4 For New Zealand In ICC Tournaments | 'जखमी वाघ' रचिन रविंद्रनं कमबॅक मॅचमध्ये रचला इतिहास; ICC स्पर्धेत मारला शतकी 'चौकार'

'जखमी वाघ' रचिन रविंद्रनं कमबॅक मॅचमध्ये रचला इतिहास; ICC स्पर्धेत मारला शतकी 'चौकार'

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Rachin Ravindra Record First ICC Champions Trophy Century : चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेआधी पाकमधील तिरंगी मालिकेतील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात रक्तबंबाळ होऊन दुखापतग्रस्त झालेल्या रचिन रविंद्र यानं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत धमाक्यात पदार्पण केले. बांगलादेश विरुद्धच्या सामन्यात त्याच्या भात्यातून शतक आले. दुखापतीतून सावरुन संघात परतलेल्या या जखमी वाघानं संघ अडचणीत असताना आश्वासक शतकी खेळी केली. आगामी स्पर्धेत धमाका करण्यासाठी त्याने एक प्रकारचे डरकाळीच फोडलीये.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

दुखापत झाली, त्यातून सावरून परतला अन् खास विक्रमही रचला

 पाकिस्तान गद्दाफीच्या मैदानात फिल्डिंग करताना त्याच्या कपाळावर चेंडू लागला होता. या दुखापतीनंतर तिरंगी मालिकेतील उर्वरित सामन्यासह चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पहिल्या सामन्यालाही तो मुकला होता. या दुखापतीतून सावरत  बांगलादेशविरुद्धच्या सामन्यातून त्याने चॅम्पिियन्स ट्रॉफी स्पर्धेत पदार्पण केले. या सामन्यात ९५ चेंडूत शतक साजरे करत त्याने खास विक्रमालाा गवसणी घातील. आयसीस वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यात शतक झळकवणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे.  

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या पदार्पणात शतक ठोकणारा पहिला अन् ... 

विल यंग खातेही न उघडता माघारी फिरल्यावर केन विल्यम्सन ५ (४) आणि डेवॉन कॉन्वे ३० (४५) स्वस्तात माघारी फिरल्यावर संघ अडचणीत असताना कमबॅक सामन्यात रचिन रवींद्रनं सामन्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने टॉम लॅथमच्या साथीनं शतकी भागीदारी करत त्याने संघाचा डाव सावरला. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील पदार्पणाच्या सामन्यातील शतकासह ११ डावात त्याने आयसीसी स्पर्धेत चौथे शतक झळकावले आहे. न्यूझीलंडकडून आयसीसी स्पर्धेतील सर्वाधिक शतकांचा रेकॉर्डही आता त्याच्या नावे झालाय. अवघ्या २५ व्या वर्षी त्याने ही मजल मारलीये.  

Web Title: Bangladesh vs New Zealand 6th Match Rachin Ravindra Record First ICC Champions Trophy Century And Most 4 For New Zealand In ICC Tournaments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.