Bangladesh Pacer Jahanara Alam Accuses Former Selector Manjurul Islam Of Harassment : बांगलादेश महिला क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज जहानारा आलम (Jahanara Alam ) हिनं माजी निवडसमिती सदस्य आणि माजी क्रिकेटपटू मंज़ुरुल इस्लाम (Manjurul Islam) यांच्यावर लैंगिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. सध्या मानसिक आरोग्याच्या कारणामुळे जहानारा ही संघाबाहेर आहे. २०२२ च्या महिला वनडे वर्ल्डकपदरम्यान राष्ट्रीय संघ व्यवस्थापनाकडून अशोभनीय प्रस्ताव आले. नकार दिल्यावर मंज़ुरुल इस्लाम याने करिअरमध्ये अडथळा आणण्यास सुरुवात केली, असा गंभीर आरोप जहानारा आलम हिने केला आहे. याआधी तिने बांगलादेशची कर्णधार निगार सुलतान ही संघातील खेळाडूंना मारहाण करते, असा आरोप केला होता. तिच्या आरोपामुळे बांगलादेश क्रिकेटमध्ये नेमकं काय सुरुये? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नेमकं काय म्हणाली आहे बांगलादेशची क्रिकेटर
बांगलादेशी पत्रकार रियासत अझीम यांच्या यूट्यूब चॅनेलवर दिलेल्या मुलाखतीत जहानारा म्हणाली की, 'मला एकदाच नव्हे तर वारंवार अशोभनीय प्रस्ताव देण्यात आले. ज्यावेळी तुम्ही संघाचा भाग असता, त्यावेळी यावर बोलू शकत नाही. कारण व्यक्त झाल्यामुळे तुमचं करिअर धोक्यात येऊ शकते. गैरवर्तन झाल्यावर बांगलादेश क्रिकेट मंडळातील (BCB) वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे मदत मागितली, पण कोणत्याही पातळीवर कारवाई झाली नाही, असा दावाही तिने केला आहे. जहानारानं म्हणाली आहे की, बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नजमुद्दीन चौधरी आणि महिला समिती प्रमुख नादेल चौधरी यांच्याकडे वारंवार तक्रार केली, पण त्यांनी कोणतंही ठोस पाऊल उचललं नाही.
२०२१ पासून सुरु झाला हा प्रकार
२०२१ पासून गैरवर्तनचा प्रकार सुरु झाला हे सांगताना ती म्हणाली की, तोहिद भाई (बांगलादेश महिला संघाशी संबंधित अधिकार ) यांनी बाबू भाईच्या माध्यमातून माझ्याशी संपर्क साधला. तोहिद सरांकडे लक्ष असू दे. असे बाबू भाई म्हणाला. यावर ते प्रमुख आहेत मी काय त्यांच्याकडे लक्ष देणार, असे म्हणत मी प्रस्ताव धुडकावून लावला, त्यानंतर मंजू भाई (मंज़ुरुल इस्लाम) याने माझ्याशी गैरवर्तन सुरू केलं."
२०२२ च्या वर्ल्डकपदरम्यान जे घडलं तेही सांगितलं
२०२२ च्या वर्ल्डकपदरम्यान मंज़ुरुल इस्लाम यांनी पुन्हा गैरवर्तन केलं. संघाच्या शिबीर गोलंदाजीचा सराव करत असताना ते नेट्समध्ये आले आणि त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. ते अनेकदा महिला खेळाडूंना आपल्या जवळ ओढून बोलण्याचा प्रयत्न करत. त्यामुळे आम्ही त्यांच्यापासून अंतर ठेवायचो. सामना झाल्यानंतरही हस्तांदोलनही दूरूनच करायचो." अशी गोष्टही तिने बोलून दाखवली आहे.
सर्वात धक्कादायक खुलासा, पिरियड्सबद्दलही विचारपूस केल्याचाही दावा
जहानारानं हिने यावेळी मासिक पाळीच्या वैयक्तिक प्रश्न विचाल्याचा खळबळजनक दावाही केला आहे. एकदा त्यांनी माझा हात धरला आणि विचारलं ‘तुझा पिरियड सुरू होऊन किती दिवस झाले?’ मी सांगितलं, तर म्हणाले – ‘पाच दिवस? उद्या संपायला पाहिजे ना? संपल्यावर सांग, मला बघायचं आहे.’ मी काहीच बोलले नाही." ही गोष्ट सांगताना जहानारानं हिने हे देखील स्पष्ट केलं की, अशा प्रकारच्या वैयक्तिक माहितीचा संबंध फक्त फिजिओकडे वैद्यकीय कारणांसाठी असतो, निवडकर्त्याला अशी विचारपूस करण्याची गरजच नसते.
मंज़ुरुल इस्लाम यांची प्रतिक्रिया म्हणाले...
या आरोपांवर मंज़ुरुल इस्लाम यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, "हे सर्व आरोप पूर्णपणे खोटे आणि निराधार आहेत. बाकीच्या खेळाडूंनाही विचारा, मी कसा माणूस आहे." जहानारानं एका दिवंगत व्यक्तीचं नाव घेतलं असून ती एक कथा रचत आहे, अशी प्रतिक्रिया एका अधिकाऱ्यानं दिली आहे.
BCB ची भूमिका काय?
बांगलादेश क्रिकेट मंडळानं मात्र (BCB) या आरोपांना गांभीर्यानं घेतलं असून यासंदर्भात तपास सुरू करण्याबाबत निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. BCB चे उपाध्यक्ष शखावत हुसेन म्हणाले की, हे आरोप अत्यंत गंभीर असून चौकशी समिती नेमून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल.
Web Summary : Jahanara Alam, Bangladesh cricketer, accuses selector Manjurul Islam of sexual harassment, inappropriate advances during 2022 World Cup. BCB to investigate.
Web Summary : बांग्लादेशी क्रिकेटर जहानारा आलम ने चयनकर्ता मंज़ूरुल इस्लाम पर यौन उत्पीड़न और 2022 विश्व कप के दौरान अनुचित प्रस्ताव रखने का आरोप लगाया। BCB जांच करेगा।