मागील काही दिवसांपासून बांग्लादेश आणि भारतामधील संबंध बिघडले आहेत. बांगलादेशमधील क्रिकेटपट्टूंना भारतात खेळण्याविरोधात भारतीयांनी मोठी मोहिम सुरू केली होती. अखेर बीसीसीआयने याबाबत केकेआरला आदेश दिले. दरम्यान, आता बांगलादेशने भारतीय खेळांविरुद्ध एक मोठा निर्णय घेतला आहे. सोमवारी एक निवेदन जारी करण्यात आले. आयपीएलसह अनेक क्रीडा स्पर्धा बांगलादेशमध्ये प्रसारित केल्या जाणार नाहीत, असे एका या निवेदनात म्हटले आहे. बांगलादेशने टी-२० विश्वचषक खेळण्यासाठी भारतात येण्यास नकार दिला आहे.
AUS vs ENG Ashes Test : जो रुटनं केली पाँटिंगची बरोबरी; सचिन तेंडुलकरचा ऐतिहासिक विक्रम धोक्यात!
अधिकाऱ्यांनी आयपीएलशी संबंधित सर्व प्रसारणे, प्रमोशन आणि कार्यक्रमांचे कव्हरेज अनिश्चित काळासाठी स्थगित केले आहे. हा निर्णय "जनहितार्थ" घेण्यात आला आहे. यापूर्वी, बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्ताफिजुर रहमानला कोलकाता नाईट रायडर्स संघातून सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
बांगलादेशमध्ये अल्पसंख्याकांवर होत असलेल्या हल्ल्यांमुळे, रहमानच्या संघात समावेशाला भारतात मोठा विरोध झाला होता. हा निर्णय बीसीसीआयकडून निर्देशित होता, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या संदर्भात कोणतेही "तार्किक" कारण देण्यात आलेले नाही, असंही अधिकाऱ्यांनी सांगितले.
सामना भारताबाहेर घेण्याची मागणी
सुरक्षा चिंता आणि सरकारी सल्ल्याचा हवाला देत बांगलादेश क्रिकेट बोर्डाने पुढील महिन्यात होणाऱ्या T20 विश्वचषकासाठी आपला राष्ट्रीय संघ भारतात न पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.
रहमानला आयपीएलमधून अचानक वगळल्यानंतर, बीसीबीने शनिवारी रात्री बैठक बोलावली. यानंतर, संचालक मंडळाने ७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी भारतात न जाण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले.