Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026: BCCIच्या निर्णयानंतर KKRने संघातून काढून टाकलेला बांगलादेशी मुस्तफिजुर म्हणतो...

Mustafizur Rahman KKR BCCI IPL 2026: भारत आणि बांगलादेश यांच्यातील बिघडलेले राजकीय संबंध आणि वाढता विरोध लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 21:39 IST

Open in App

Mustafizur Rahman KKR BCCI: IPL 2026 च्या हंगामापूर्वी एक मोठी बातमी समोर आली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) सूचनेनंतर कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) बांगलादेशचा स्टार वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याला संघातून मुक्त (Release) केले. भारत आणि बांगलादेश यांच्यातील बिघडलेले राजकीय संबंध आणि वाढता विरोध लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?

डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या मिनी लिलावात केकेआरने मुस्तफिजुरला ९.२० कोटी रुपयांची मोठी बोली लावून खरेदी केले होते. मात्र, बांगलादेशातील अल्पसंख्याकांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे भारतात बांगलादेशी खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळवण्यावरून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. भाजप आणि इतर काही संघटनांनी केकेआर आणि शाहरुख खान यांच्यावर टीका केली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून बीसीसीआयने अखेर हस्तक्षेप केला आणि केकेआरला मुस्तफिजुरला संघातून बाहेर काढण्याचे निर्देश दिले.

मुस्तफिजुर रहमानची पहिली प्रतिक्रिया

संघातून काढून टाकल्यानंतर मुस्तफिजुर रहमानने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली पहिली प्रतिक्रिया दिली. त्याने या वादावर थेट भाष्य करणे टाळले असले, तरी त्याने आपल्या कामगिरीबाबत बोलून काही गोष्टी सूचित करायचे प्रयत्न केले. बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये (BPL) ४०० टी-२० विकेट्सचा टप्पा ओलांडल्यानंतर त्याने 'X' वर (ट्विटर) लिहिले: आणखी एका टप्प्यासाठी (Milestone) आभार. ४०० टी२० बळी आणि सिलहट टायटन्सविरुद्ध मिळालेला विजय आनंददायी आहे. चांगली कामगिरी करण्यासाठी मी नेहमीच कृतज्ञ असतो. सर्वांच्या प्रेमासाठी आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद."

 

 

केकेआरला मिळणार रिप्लेसमेंट

बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केले आहे की, मुस्तफिजुरला रिलीज केल्यानंतर केकेआरला त्याच्या जागी दुसरा खेळाडू (Replacement) निवडण्याची परवानगी दिली जाईल. केकेआरनेही अधिकृत पत्रक काढून या निर्णयाला दुजोरा दिला आहे. मुस्तफिजुरने आतापर्यंत आयपीएलमध्ये ६० सामन्यांत ६५ विकेट्स घेतल्या आहेत. तो याआधी सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांसारख्या मोठ्या संघांकडून खेळला आहे. मात्र, २०२६ चा हंगाम तो खेळू शकणार नाही हे आता स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :ऑफ द फिल्डआयपीएल २०२६बांगलादेशकोलकाता नाईट रायडर्स