Join us

WomensAsiaCup2018:  सलग सातव्यांदा चॅम्पियन बनण्याचं महिला संघाचं स्वप्न भंगलं

भारतीय महिला संघाचं सलग सातव्यांचा आशिया कप पटकावण्याचं स्वप्न भंगलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2018 16:19 IST

Open in App

क्लालालंपूर- भारतीय महिला संघाचं सलग सातव्यांचा आशिया कप पटकावण्याचं स्वप्न भंगलं आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय महिला संघाला बांगलादेशकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. भारतीय महिला संघानं विजयासाठी 112 धावांचं दिलेलं लक्ष्य बांगलादेशनं 7 गड्यांच्या मोबदल्यात पार केलं. त्याचबरोबर बांगलादेशनं पहिल्यांदाच टी-20 आशिया कपवर नाव कोरलं. या स्पर्धेत बांगलादेशनं दुस-यांदा भारतीय महिला संघाला पराभवाची धूळ चारली.आयशा रहमना (17 धावा) आणि शमीमा सुलताना (16 धावा) ही जोडी पूनम यादवने स्वतःच्या फिरकीनं फोडली. त्यानंतर मैदानावर आलेल्या निगार सुल्ताना 27 आणि रुमाना अहमद 23 यांनी बांगलादेशाला पुन्हा सामन्यावर पकड मिळवून दिली. बांगलादेशला शेवटच्या षटकांत विजयासाठी 9 धावांची गरज असतानाच शेवटच्या चेंडूवर जहानारा आलमने दोन धावा काढत बांगलादेशच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. तत्पूर्वी पहिल्यांदा फलंदाजी करणा-या भारतीय महिला संघानं हरमनप्रीच्या नेतृत्वात 9 बाद 112 धावा केल्या होत्या. त्यात कर्णधार कौरनेच 42 चेंडूंत 56 धावा काढून भारताच्या धावसंख्येत भर घातली. कौरवगळत इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आलेली नाही.