एकाच सामन्यात बांगलादेशचे चार खेळाडू जखमी, दोघांना स्ट्रेचरवरुन नेले

Bangladesh vs Srilanka: बांग्लादेश vs श्रीलंका सीरिजमध्ये बांग्लादेशचे 4 खेळाडू जखमी झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 07:20 PM2024-03-18T19:20:34+5:302024-03-18T19:21:29+5:30

whatsapp join usJoin us
BAN vs SL: ban-vs-sl-3rd-odi-bangladesh-4-players-injured | एकाच सामन्यात बांगलादेशचे चार खेळाडू जखमी, दोघांना स्ट्रेचरवरुन नेले

एकाच सामन्यात बांगलादेशचे चार खेळाडू जखमी, दोघांना स्ट्रेचरवरुन नेले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Bangladesh vs Srilanka ODI:बांगलादेशने तीन वन-डे सामन्यांच्या सीरिजमध्ये श्रीलंकेचा 2-1 ने पराभव केला. बांगलादेशने मालिकेतील तिसरा सामना 4 विकेट्सने जिंकला. हा सामना सोमवारी चितगाव येथे झाला. बांगलादेशने मालिका जिंकली, पण खेळाडूंसाठी हा दिवस खुव वाईट ठरला. याचे कारण म्हणजे, या सामन्यात बांग्लादेशचे चार खेळाडू जखमी झाले. वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान, अनामूल हक, झाकीर अली आणि सौम्या सरकार यांना मैदान सोडून जावे लागले. यातील दोघांना स्ट्रेचरवरुन नेण्यात आले. 

वन-डे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात श्रीलंका प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला होता. यादरम्यान मुस्तफिजुर रहमान आणि झाकीर अली गंभीर जखमी झाले. या दोन्ही खेळाडूंना स्ट्रेचरवरुन बाहेर न्यावे लागले. मुस्तफिजुर 48 वे षटक टाकत होता. या षटकाचा पहिला चेंडू टाकल्यानंतर त्याला दुखापत झाली. त्याची प्रकृती इतकी बिघडली की, उठताही येत नव्हते. यानंतर त्याला स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर काढाले.

यानंतर दुसरी घटना 50 व्या षटकात घडली. बांगलादेशचा तस्किन अहमद शेवटचे षटक टाकत होता. फलंदाजाने पाचव्या चेंडूवर एक शॉट खेळला. चेंडू हवेत होता. हे पाहून अनामूल आणि झाकीर दोघेही चेंडूकडे धावले. यावेळी दोघांमध्ये जोरदार टक्कर झाली. यात झाकीर जखमी झाला, ज्यामुळे त्यालाही स्ट्रेचरवरुन बाहेर न्यावे लागले. बांगलादेशचा खेळाडू सौम्या सरकारदेखील बॉल रोखण्याचा प्रयत्नात फलकावर आदळला. त्याच्या मानेला बोर्ड लागून दुखापत झाली. 

सामन्याचा निकाल
तिसऱ्या वनडेत श्रीलंकेने 235 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात श्रीलंकेने 40.2 षटकांत 6 गडी गमावून हे लक्ष्य गाठले. 

Web Title: BAN vs SL: ban-vs-sl-3rd-odi-bangladesh-4-players-injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.