Join us
Daily Top 2Weekly Top 5

BAN vs PAK : सलमान अली आगाच्या शतकानंतरही पाकवर पराभवाची नामुष्की; बांगलादेशचा वनडे मालिकेवर कब्जा

घरच्या मैदानात बांगलादेशचा जलवा; पाकिस्तानवर पराभवाची नामुष्की

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 22:59 IST

Open in App

Bangladesh vs Pakistan, 3rd ODI : ढाका येथील शेर बांग्ला नॅशनल स्टेडियमवर रंगलेल्या तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात बांगलादेशच्या संघाने शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात पाकिस्तानला ११ धावांनी पराभूत केले. या सामन्यातील विजयासह बांगलादेशच्या संघाने ३ सामन्यांची वनडे मालिका २-१ अशी आपल्या नावे केली. पाकिस्तानचा कर्णधार शाहीन शाह आफ्रिदीनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

सलमान अली आगाच्या खेळीवर भारी पडलं तंझिमचं शतक

पहिल्यांदा फलंदाजी करताना सलामीवीर तंझिम हसन तमिम याने १०७ चेंडूत केलेल्या १०७ धावांसह विकेट किपर बॅटर लिटन दास ४१ (५१) आणि तौहीद हृदोय नाबाद ४८ (४४) धावांच्या उपयुक्त खेळीच्या जोरावर बांगलादेशच्या संघाने निर्धारित ५० षटकात ५ बाद २९० धावा करत पाकिस्तानसमोर २९१ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाकडून सलमान अली आगानं शतकी खेळी केली. पण ही खेळी पाकचा पराभव टाळू शकली नाही. 

कोणताही संघ संघटनेपेक्षा मोठा नसतो; ICC अध्यक्ष जय शाह यांचा पाकिस्तानसह बांगलादेशला टोला

बांगलादेशकडून तस्किन अहमद अन् मुस्तफिझुर रहमानचा भेदक मारा

 धावांचा बचाव करताना बांगलादेशकडून तस्किन अहमदनं सर्वाधिक ४ तर मुस्तफिझुर रहमान याने ३ विकेट्स घेत बांगलादेशला मालिका विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या दोघांशिवाय नाहिद राणानं २ तर रिशाद हुसैन याने एक विकेट आपल्या खात्यात जमा केली. परिणामी पाकिस्तानचा संघ निर्धारित ५० षटकात २७९ धावांवर आटोपला. 

आघाडीच्या फलंदाजांनी नांगी टाकल्यावर सलमान आगानं शतक ठोकले, पण...

बांगलादेशच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या आघाडीच्या फलंदाजांनी निराश केले. अवघ्या ८५ धावांत अर्धा संघ तंबूत परतला होता. संघ अडचणीत असताना सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या सलमान अली आगानं ९८ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १०६ धावांची खेळी केली. त्याच्याशिवाय शान मसूदने ४४ चेंडूत ३८ धावांसह तळाच्या फलंदाजीत कर्णधार शाहीन शाह आफ्रिदीनं केलेल्या ३८ चेंडूतील ३७ धावांच्या जोरावर पाकिस्तानच्या संघाने सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. पण शेवटी बांगलादेशच्या संघाने ११ धावांनी बाजी मारली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Bangladesh Clinches ODI Series Despite Salman Ali Agha's Century.

Web Summary : Bangladesh defeated Pakistan by 11 runs in a thrilling match, securing the ODI series 2-1. Tanzim Hasan Tamim's century and Taskin Ahmed's bowling led Bangladesh to victory, despite Salman Ali Agha's ton for Pakistan.
टॅग्स :बांगलादेशपाकिस्तान