Join us
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानला पराभव पचनी पडेना! बांगलादेशसह अंपायरवर चिटिंगचा आरोप; थेट सामनाधिकाऱ्यांकडे तक्रार

बांगलादेशनं घेतलेल्या DRS वर पाकिस्तानचा आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 13:28 IST

Open in App

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या वनडे मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात जोरदार ड्रामा पाहायला मिळाला. शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झालेला सामना जिंकत बांगलादेशच्या संघाने ही मालिका २-१ अशी खिशात घातली. ढाका येथील शेर बांग्ला नॅशनल स्टेडियमवरील सामन्यातील पराभवानंतर पाकिस्तानची रडारड चर्चेत आली आहे. DRS च्या मुद्यावरून पाकिस्तानच्या संघाने थेट सामनाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

बांगलादेशनं घेतलेल्या DRS वर पाकिस्तानचा आक्षेप

DRS संदर्भातील हा संपूर्ण ड्रामा डावाच्या शेवटच्या षटकात घडला. शेवटच्या दोन चेंडूंवर पाकिस्तानला विजयासाठी 12 धावांची गरज होती. रिशाद हुसेनने पाचवा चेंडू शाहीन आफ्रिदीकडे लेग साइडला टाकला, जो पिचवर पडून बाहेर गेला. अंपायरने तो तत्काळ वाइड दिला. मात्र काही वेळानंतर बांग्लादेशच्या संघाने LBW साठी रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला. बांग्लादेशच्या खेळाडूंनी रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेताच पाकिस्तानचा कर्णधार शाहीन आफ्रिदी नाराज झाला.

BCCI ची घोडचूक! रोहितचं श्रेय गिलला; चाहत्यांचा संताप! नेमकं काय घडलं?”

रिप्ले पाहिल्यानंतर घेतला रिव्ह्यू

नियमांनुसार, मोठ्या स्क्रीनवर रिप्ले दाखवण्यापूर्वीच कोणत्याही संघाला रिव्ह्यू घेण्याची परवानगी असते. बांग्लादेशने ज्या चेंडूवर रिव्ह्यू घेतला तो आधीच वाइड देण्यात आला होता, त्यामुळे या चेंडूवर रिव्ह्यू घेण्याची शक्यता कमी होती. पाकिस्तान संघाचे म्हणणे आहे की, बांग्लादेशने या नियमांचे पालन केले नाही. स्टेडियमच्या मोठ्या स्क्रीनवर त्या चेंडूचा रिप्ले दाखवण्यात आला होता आणि तो पाहिल्यानंतर बांगलादेशला चेंडूचा संपर्क झाल्याचा अंदाज आला. त्यानंतर त्यांनी रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तान यावरही नाराज आहे की, बांग्लादेशला कदाचित ठरलेल्या १५ सेकंदांच्या वेळेनंतर रिव्ह्यू करण्याची परवानगी देण्यात आली.

पाकिस्तानने  सामनाधिकाऱ्यांकडे धाव घेत नोंदवली तक्रार

ESPN क्रिकइन्फोच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या संघाने या प्रकरणात सामनाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. मैदानातील पंच कुमार धर्मसेना यांनी बांगलादेशला LBW साठी रिव्ह्यू घेण्याची परवानगी का दिली? असा सवालही पाकस्तान संघाने उपस्थित केला आहे. पाकिस्तान व्यवस्थापनाचे म्हणणे आहे की, मोठ्या स्क्रीनवर रिप्ले दाखवल्यानंतरच बांगलादेशने रिव्ह्यू घेतला. त्या रिप्लेच्या आधारे थर्ड अंपायरने शाहीन आफ्रिदीला बाद दिले आणि ऑन-फिल्ड अंपायरला आपला निर्णय बदलावा लागला. 

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan alleges cheating after loss to Bangladesh, complains to match referee.

Web Summary : Pakistan alleges cheating by Bangladesh and umpires in the ODI series loss. They filed a complaint about a DRS review taken after a replay was shown on the big screen, violating rules. Pakistan questions the umpire's decision to allow the review.
टॅग्स :पाकिस्तानबांगलादेश