Join us  

BAN vs PAK : बाबर आजमच्या पाकिस्तान संघानं युगांडाचा विक्रम मोडला; हसन अलीला ICCनं दंड ठोठावला

Bangladesh vs Pakistan, 2nd T20I : बाबर आजमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघानं दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात बांगलादेशवर ८ विकेट्स व ११ चेंडू राखून विजय मिळवला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2021 5:34 PM

Open in App

Bangladesh vs Pakistan, 2nd T20I : बाबर आजमच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघानं दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात बांगलादेशवर ८ विकेट्स व ११ चेंडू राखून विजय मिळवला. पाकिस्ताननं यासह मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. पाकिस्ताननं आजच्या विजयासह दक्षिण आफ्रिका व युगांडा या संघांचा विक्रम मोडला. पण, या सामन्याआधी आयसीसीनं गोलंदाज हसन अली ( Hasan Ali) याला दंड ठोठावला.

पहिल्या ट्वेंटी-२०त हसन अलीनं आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन करताना बांगलादेशच्या फलंदाजाला बाद केल्यानंतर इशारा केला. त्यामुळे आयसीसीच्या २.५ कलमांतर्गत आयसीसीनं त्याला १ डिमेरिट  गुण व मानधनातील २० टक्के रक्कम दंड म्हणून भरण्यास सांगितली.  

प्रथम गोलंदाजी करताना यजमान बांगलादेशला बॅकफूटवर टाकले आहे. शाहिन आफ्रिदीनं पहिल्या षटकात, तर मोहम्मद वासीमनं दुसऱ्या षटकात बांगलादेशला धक्के दिले. २ बाद ५ अशी अवस्था बांगलादेशची झाली होती, परंतु नजमुल होसैन व आफिफ होसैन यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४६ धावा जोडल्या.  आफिफ २० धावांवर माघारी परतला. नजमुलला अन्य फलंदाजांकडून साथ न मिळाल्यानं बांगलादेशला ७ बाद १०८ धावाच करता आल्या. नजमुलनं ४० धावा केल्या. शाहिन आफ्रिदी व शादाब खान यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरात, बाबर आजम पुन्हा अपयशी ठरला. मोहम्मद रिझवाननं ३९ व फाखर झमाननं नाबाद ५७ धावा करताना पाकिस्तानचा विजय पक्का केला. २०२१मधील पाकिस्तानचा हा १० वा ट्वेंटी-२० सामन्यांतील विजय ठरला. यासह त्यांनी या वर्षी सर्वाधिक १५ ट्वेंटी-२० सामने जिंकणाऱ्या दक्षिण आफ्रिका व युगांडा यांचा विक्रम मोडला.  

संबंधित बातम्या

षटकार खेचला म्हणून शाहिन आफ्रिदीला राग आला; बांगलादेशच्या फलंदाजाला चेंडू फेकून मारला Video 

बाबो; पाकिस्तानच्या हसन अलीनं फेकला  219 kph वेगानं चेंडू, फिरकीपटू मुहम्मद नवाजनं टाकलेल्या चेंडूचा वेग 148 kph! Video 

टॅग्स :पाकिस्तानबांगलादेशटी-20 क्रिकेट
Open in App