बांगलादेशचा सलामीवीर तांझिद हसन तमीम (Tanzid Hasan Tamim) याने पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या आणि निर्णायक वनडे सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले. सलमान अली आगाच्या गोलंदाजीवर उत्तुंग षटकार मारत त्याने अगदीत तोऱ्यात शतकाला गवसणी घातली. वनडेत पाच वेळा ५० पेक्षा अधिक धावा केल्यावर ३० व्या सामन्यातील ३० व्या डावात त्याने शतक साजरे केले. त्याच्या या खेळीच्या जोरावर बांगलादेशच्या संघाने पाकिस्तानी गोलंदाजांना बॅकफूटवर ढकलल्याचे पाहायला मिळाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेत दुसऱ्यांदा साधला फिफ्टी प्लसचा डाव
पाकिस्तानचा संघ बांगलादेश दौऱ्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात तांझिद हसन तमीम याने ६७ धावांची खेळी करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. दुसरा सामना पाकिस्तानच्या संघाने जिंकल्यावर ही मालिका १-१ अशी बरोबरीत असताना तांझिद हसन समीम याने संघाला मालिका जिंकून देणारी उपयुक्त खेळी साकारली.
कोणताही संघ संघटनेपेक्षा मोठा नसतो; ICC अध्यक्ष जय शाह यांचा पाकिस्तानसह बांगलादेशला टोला
सलामीवीरांची शतकी भागीदारी
ढाका येथील शेर बांग्ला नॅशनल स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना तांझिद आणि सैफ हसन या सलामी जोडीनं पहिल्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी रचली. सैफ हसन ५५ चेंडूत ३६ धावा करुन परतल्यावर त्याने नझमुल होसेन शांतोच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी ६७ चेंडूत ५३ धावांची उपयुक्त भागीदारी केली. शतक साजरे केल्यावर तो आणखी मोठी खेळी करेल, असे वाटत असताना अहमद अबरार अहमद याने त्याच्या खेळीला ब्रेक लावला. तांझिदने १०७ चेंडूत १०७ धावा करताना ६ चौकार आणि ७ षटकार मारले.
त्याच्या शतकी डावाच्या जोरावर बांगलादेश मालिका जिंकणार?
पाकिस्तानविरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात बांगलादेशच्या संघाने ८ विकेट्सने विजय नोंदवला होता. लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानच्या संघाने दुसऱ्या सामन्यात डकवर्थ लुईस नियमानुसार,१२८ धावांनी विजय नोंदवत मालिकेत बरोबरीचा डाव साधला. तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यात नाणेफेक जिंकून शाहीन शाह आफ्रिदीनं पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तांझिमच्या शतकामुळे पाकिस्तानचा निर्णय फसल्याचे चित्र निर्माण झाले. हे शतक बांगलादेशला मालिका विजय मिळवून देणारे ठरणार का? ते पाहण्याजोगे असेल.
Web Summary : Tanzid Hasan Tamim scored his maiden ODI century against Pakistan, propelling Bangladesh. His ton, featuring sixes, anchored a strong batting performance after an opening partnership of 105. Bangladesh aims for a series victory after sharing wins.
Web Summary : तंज़ीद हसन तमीम ने पाकिस्तान के खिलाफ अपना पहला एकदिवसीय शतक बनाया, जिससे बांग्लादेश को बढ़ावा मिला। छक्कों से सजी उनकी शतकीय पारी ने 105 रनों की शुरुआती साझेदारी के बाद मजबूत बल्लेबाजी प्रदर्शन किया। बांग्लादेश की नजरें सीरीज जीत पर हैं।