BAN vs NZ : न्यूझीलंडचा संपूर्ण संघ ६० धावांत परतला माघारी, ट्वेंटी-२०तील सर्वात खराब कामगिरी 

 New Zealand tour of Bangladesh : बांगलादेश दौऱ्यावर दुसऱ्या फळीचा संघ पाठवणे न्यूझीलंडला महागात पडले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2021 04:51 PM2021-09-01T16:51:09+5:302021-09-01T16:55:09+5:30

whatsapp join usJoin us
BAN vs NZ : 60 all out - New Zealand have been dismissed for their joint-lowest total in T20Is  | BAN vs NZ : न्यूझीलंडचा संपूर्ण संघ ६० धावांत परतला माघारी, ट्वेंटी-२०तील सर्वात खराब कामगिरी 

BAN vs NZ : न्यूझीलंडचा संपूर्ण संघ ६० धावांत परतला माघारी, ट्वेंटी-२०तील सर्वात खराब कामगिरी 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 New Zealand tour of Bangladesh : बांगलादेश दौऱ्यावर दुसऱ्या फळीचा संघ पाठवणे न्यूझीलंडला महागात पडले. ऑस्ट्रेलियन संघानं काही दिवसांपूर्वी अशीच चूक केली होती आणि बांगालदेशनं पाच सामन्यांच्या मालिकेत ४-१ असा विजय मिळवला होता. तशीच चूक किवींनी केली आणि त्याची प्रचिती पहिल्याच सामन्यात आली. किवी संघाला संपूर्ण २० षटकंच खेळता आली नाहीत. 

आजपासून बांगलादेश विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या ट्वेंटी-२० मालिकेतील पहिला सामना सुरू झाला. प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांना खेळपट्टीवर फार काळ टिकता आले नाही. टॉम ब्लंडल ( २), रचिन रवींद्र ( ०), विल यंग ( ५) व कॉलिन डी ग्रँडहोम ( १) हे चार फलंदाज फलकावर ९ धावा असताना माघारी परतले. कर्णधार टॉम लॅथम ( १८) व हेन्री निकोल्स ( १७) यांनी संघर्ष केला. पण त्यांचा संपूर्ण संघ ६० धावांत तंबूत परतला. यापूर्वी २०१४मध्ये श्रीलंकेविरुद्ध किवींचा संघ ६० धावांवर माघारी परतला होता. ( New Zealand 60 All Out in 16.5 Overs against Bangladesh In 1st T20I #BANvNZ ) 

मुस्ताफिजुर रहमाननं  १३ धावांत ३ विकेट्स घेतल्या, तर नसून अहमद, शाकिब अल हसन व मोहम्मद सैफुद्दीन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. 

Web Title: BAN vs NZ : 60 all out - New Zealand have been dismissed for their joint-lowest total in T20Is 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.