Join us  

केन विल्यमसनने केली कोहलीशी बरोबरी, झळकावले २९वे कसोटी शतक

Ban Vs NZ 1st Test: केन विल्यमसनने (१०४ धावा, २०५ चेंडू, ११ चौकार) बुधवारी २९वे कसोटी शतक झळकावीत भारताच्या विराट कोहलीशी बरोबरी साधली. केनचे यंदाचे हे चौथे, तर सलग तिसरे शतक आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 9:12 AM

Open in App

सिलहट -  केन विल्यमसनने (१०४ धावा, २०५ चेंडू, ११ चौकार) बुधवारी २९वे कसोटी शतक झळकावीत भारताच्या विराट कोहलीशी बरोबरी साधली. केनचे यंदाचे हे चौथे, तर सलग तिसरे शतक आहे. २०२३मध्ये तो सर्वाधिक कसोटी शतके ठोकणारा फलंदाज ठरला आहे. परंतु, विलियम्सनच्या या दमदार खेळीनंतरही न्यूझीलंडचा पहिला डाव बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत गडगडला. 

बांगलादेशचा पहिला डाव ८५.१ षटकांत ३१० धावांत गुंडाळल्यानंतर न्यूझीलंडची दुसऱ्या दिवसअखेर ८४ षटकांत ८ बाद २६६ अशी अवस्था झाली. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा काइल जेमिसन (७*) आणि टिम साऊदी (१*) हे खेळपट्टीवर नाबाद होते. किवी संघ अजूनही ४४ धावांनी मागे आहे.

त्याआधी बांगलादेशचा पहिला डाव ३१० धावांत आटोपला. केनशिवाय ग्लेन फिलिप्स (४२) आणि डेरिल मिचेल (४१) यांनी थोडीफार झुंज दिली. अन्य फलंदाज मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. टॉम लॅथम (२१) आणि डेवोन कॉन्वे (१२) हे लवकर बाद झाले. हेन्री निकोल्सदेखील १९ धावांवर माघारी परतला. केनने मिचेलसोबत ६६ आणि फिलिप्ससोबत ७८ धावांची भागीदारी करत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. केन बाद होताच न्यूझीलंडची स्थिती ८ बाद २६२ अशी झाली. 

 बांगलादेशकडून फिरकीपटू तैजुल इस्लामने टॉम लॅथम, डेरिल मिचेल, केन विल्यमसन आणि ईश सोढी यांना बाद केले.  शोरिफूल इस्लाम, मेहदी हसन मिराज, नइम हसन आणि मोमिनुल हक यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

संक्षिप्त धावफलकबांगलादेश (पहिला डाव) : ८५.१ षटकांत सर्वबाद ३१० धावा.न्यूझीलंड (पहिला डाव) : ८४ षटकांत ८ बाद २६६ (केन विल्यमसन १०४, ग्लेन फिलिप्स ४२, डेरिल मिचेल ४१, टॉम लॅथम २१;  तैजुल इस्लाम: ३०-७-८९-४)

टॅग्स :केन विल्यमसनन्यूझीलंडबांगलादेशविराट कोहली