सिडनी : जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी एक असलेला स्टिव्ह स्मिथ हा आपल्यांच चुकांची शिक्षा भोगतोय. त्याच्या चुका त्याच्या मैदानातील कामगिरीला झाकोळून टाकतात. चेंडूशी छेडछाड प्रकरण, ड्रेसिंग रूमकडे बघून घेतलेला डीआरएस यामुळे तो नेहमीच वादात अडकतो.
अतिउत्साही फलंदाजाची तुलना नेहमीच सर डॉन ब्रॅडमन यांच्याशी केली जाते. मात्र दक्षिण आफ्रिकेत चेंडूशी छेडछाड केल्याचा त्याला मोठा फटका बसला त्याचे कर्णधारपददेखील गमावावे लागले.
खालच्या क्रमावर फलंदाजी करणाऱ्या लेगस्पिनरच्या रूपाने त्याने संघात जागा मिळवली. इंग्लंडविरोधातील अॅशेज् मालिकेत त्याने तिसºया कसोटीत कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट २३९ धावांची खेळी केली. त्याने २०१७ मध्ये १००० धावादेखील पूर्ण केल्या. सलग चौथ्या वर्षी त्याने ही कामगिरी केली. कसोटी फलंदाजांच्या रँकिंगमध्ये स्मिथ अव्वल स्थानावर आहे. २६ व्या वर्षी कर्णधार पद स्वीकारणाºया स्मिथवर कर्णधारपदाच्या दबावाचा परिणाम झाला नाही.
भारत दौºयात देखील स्मिथ याने बंगळुरू डीआरएस घेताना ड्रेसिंग रूमकडे पाहिले होते. त्यावरून मोठा गदारोळ झाला होता. २०१६ मध्ये क्राईस्ट चर्च कसोटीमध्ये त्याने पंचाशी वाद घातला होता. त्यामुळे त्याला दंडदेखील ठोठावा लागला होता.