अयाझ मेमन, संपादकीय सल्लागार
दक्षिण आफ्रिका - आॅस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेत खूप मोठा वाद निर्माण झाला आहे. दखल घेण्याची बाब म्हणजे आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने स्वत:हून चेंडूशी कुरतडल्याचे कबूल केले आहे. या योजनेमध्ये त्यांचा सलामीवीर फलंदाज बेनक्रॉफ्ट पुढाकार घेत होता आणि बाकीच्या खेळाडूंनीही या योजनेला पाठिंबा दिला होता. चेंडू रिव्हर्स स्विंग होईल, असा यामागचा उद्देश होता. विशेष म्हणजे ही मालिका अत्यंत अटीतटीची झाली असून दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकलेला आहे आणि तिसऱ्या सामन्यात आॅस्टेÑलिया संघ कुठेतरी अडकलेला दिसत आहे. त्यामुळे स्मिथचा हा निर्णय सामना वाचवण्यासाठी होता की, सामना जिंकण्यासाठी किंवा आम्ही काहीही करू शकतो कोणाला काय कळणार, या अहंकारापोटी घेतलेला होता हे कळाले नाही. पण एक गोष्ट विसरता कामा नये, की आजच्या क्रिकेटमध्ये जेथे तीस कॅमेरे लागलेले असतात, तेथे एवढं मोठं पाऊल कसे उचलले जाऊ शकते? आणि जर हे पाऊल उचलले गेलेच, तर त्यात खुद्द कर्णधार सहभागी होणं हे अनपेक्षित होत. यामुळे जागतिक क्रिकेट पूर्ण ढवळून निघालं आहे. यामुळे स्मिथला कर्णधारपद तर सोडाव सांगितलंच आहे, पण आयसीसी आणि क्रिकेट आॅस्टेÑलिया याबाबतीत काय निर्णय घेणार याकडे पाहावे लागेल.
माझ्या मते याच सामन्यातही नाही, तर यापुढेही स्मिथला कर्णधारपदावरून हटविले गेले पाहिजे. उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यालाही अशीच शिक्षा मिळाली पाहिजे. तसेच बाकीच्या खेळाडूंच्या सहभागाबाबत योग्य चौकशी व्हायला पाहिजे. एकूणंच सध्याचा हा वाद आॅस्टेÑलियन क्रिकेटला एकदम तळाला घेऊन गेला आहे. प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांचा यामध्ये काय सहभाग होता हे अद्याप कळलेले नाही. पण माझ्या मते हे इतकं सर्व योजनाबद्ध होत असताना प्रशिक्षक कसा काय सहभागी नसेल. एकूणच नाट्य बघितलं, तर कळून येतं की, बेनक्रॉफ्टविरुद्ध चौकशी होण्याचे आदेश येताच हँड्सक्रॉम्बला जो डेÑसिंग रूममध्ये बसलेला सांगण्यात येतं की हे सर्व कारनामे लपवून ठेवावं. थोडक्यात स्मार्ट कॅमेरावर्क झालेलं आहे आणि तेवढंच पोरकट चाल आॅस्टेÑलियाच्या खेळाडूंनी केली आहे. अत्यंत कणखर क्रिकेट असलेल्या आॅस्टेÑलियासाठी हे प्रकरण खूप लज्जास्पद ठरले आहे.
या प्रकरणाबाबतीत आयसीसीच्या निर्णयाकडे लक्ष लागले आहे. आतापर्यंतची घेतलेली भूमिका पाहता हे प्रकरण आयसीसीने गांभीर्याने घेतले आहे की नाही, हेच कळत नाहीए. कारण याआधी वॉर्नर आणि रबाडा यांच्यामध्ये झालेल्या वादावर रबाडाला दोन डिमेरीट गुणांसह दोन सामन्यांचे निलंबन झाले होते. चेंडू कुरतडल्याप्रकरणीही दोन डिमेरीट गुणांची शिक्षा आयसीसीच्या नियमावलीत आहे. जर कायदेशीररीत्या पुढे गेले, तर स्मिथ, वॉर्नर यासारख्या खेळाडूंना एका सामन्याची बंदी होऊ शकते कारण त्यांना दोन डिमेरीट गुण मिळणार. आयसीसीची स्वत:ची एक नियमावली आहे, क्रिकेट आॅस्टेÑलियाची एक जबाबदारी आहे आणि पुढे याचा विपरीत परिणाम आयपीएलमध्येही होईल. राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद अनुक्रमे स्मिथ आणि वॉर्नर यांना कर्णधारपदी कायम ठेवणार का, याकडे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. दरम्यान, द. आफ्रिका - आॅस्टेÑलिया मालिकेविषयी सांगायचे झाल्यास, आॅस्टेÑलियापुढे ४३० धावांचे खूप कठीण आव्हान उभे करण्यात आले आहे. स्मिथ, वॉर्नर यांच्या गच्छंतीनंतर कर्णधारपदामध्ये बदल झाले आहेत. विशेष म्हणजे त्यांना कर्णधारपदावरून काढण्यात यावे असे आॅस्टेÑलियाच्या पंतप्रधानांनी म्हटले आहे. एक वर्षापूर्वी ज्याला संघात स्थान मिळवण्यासाठी झगडावे लागत होते त्या टीम पेन याला कर्णधार म्हणून निवडण्यात आले आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय आणि खास करून आॅस्टेÑलियन क्रिकेटमध्ये खूप बदल पाहण्यास मिळत आहेत.
एकूणच आता तांत्रिक समिती, तज्ज्ञांची समिती या प्रकरणाचा किती परिणाम होऊ शकतो हे पाहतील. कारण स्मिथ, वॉर्नर आणि मिशेल स्टार्कसारखे कसलेले खेळाडू चिटिंंग करत असतील, तर बाकी खेळाडूंवर काय परिणाम होईल, हे पहावे लागेल.