Join us

Ball Tampering : स्मिथकडून झालेल्या कृत्याबद्दल नाराज  - स्टीव्ह वॉ

उपाय केले जात आहेत, त्याला माझा पाठिंबाच असेल असेही वॉने स्पष्ट केले. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 07:25 IST

Open in App

सिडनी : ऑस्ट्रेलियन क्रिकेटला हादरविणा-या चेंडू छेडखानी प्रकरणात ‘केंद्रित व संतुलित दृष्टिकोन’ राखायला हवा, असे आवाहन माजी कर्णधार स्टीव्ह वॉने केले आहे. वॉने ऑस्ट्रेलियन संघाची दगाबाजी करण्याची योजना म्हणजे ‘निर्णय घेण्यात झालेली चूक’ असल्याचे त्याने म्हटले आहे. खेळाडूंनी खिलाडूवृत्तीबाबत असलेल्या नियमांचे पुन्हा एकदा पठण करावे, असा सल्लाही त्याने यावेळी दिला. वॉ म्हणाला,‘या प्रकरणात ज्यांचा समावेश आहे त्यांच्यावर टीका करताना केंद्रित व समतोल दृष्टिकोन राखण्याची गरज आहे. आपण सर्वांनी खेळाडूंवर होणा-या सामाजिक व मानसिक प्रभावाचा गांभीर्याने विचार करायला हवा. खेळाची प्रतिष्ठा राखण्यासाठी जे काही सकारात्मक उपाय केले जात आहेत, त्याला माझा पाठिंबाच असेल असेही वॉने स्पष्ट केले. 

बदनाम झालेल्या ऑस्ट्रेलिया क्रिकेटला पुन्हा सन्मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी मंडळाला मदत करण्यास तयार आहे. आमच्या खेळाडूंवर चाहत्यांचा विश्वास निर्माण होण्यासाठी मंडळाकडून निश्चितपणे चांगले प्रयत्न होतील. स्मिथकडून झालेल्या कृत्याबद्दल मीदेखील नाराज झालो असल्याचे स्वीव्हाने सांगितले. संघातील प्रत्येक खेळाडूकडे संशयास्पदरीत्या पाहिले जाऊ नये, कारण संघातील प्रत्येक खेळाडू काही वाईट नसतो. एक-दोन खेळाडूंच्या चुका अन्य खेळाडूंच्या माथी मारणे अयोग्य असते. असेही म्हणाला. 

स्लेजिंग संपविण्याचे पंतप्रधानांचे आवाहनसिडनी : आॅस्ट्रेलियाचे पंतप्रधान मॅलकम टर्नबुल यांनी चेंडूच्या छेडखानी प्रकरणानंतर क्रिकेटची प्रतिमा सुधारण्यासाठी या खेळातून स्लेजिंग संपविण्याचे आवाहन केले आहे. टर्नबुल यांनी छेडखानी प्रकरण आॅस्ट्रेलियासाठी मानहानिजनक असल्याचे म्हटले आहे. आॅस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तिसºया कसोटी सामन्यादरम्यान चेंडूसोबत छेडखानी करण्याची योजना आखली होती, अशी कबुली दिली आहे. टर्नबुल म्हणाले, जर क्रिकेटला पुन्हा एकदा आदर्श खेळ म्हणून प्रतिमा निर्माण करायची असेल तर क्रिकेट संघटनांनी स्लेजिंगवर अंकुश लावायला हवा. स्लेजिंग करणाºया खेळाडूंवर कठोर कारवाई व्हायला हवी. यावर आता नियंत्रण नसते. स्लेजिंगला क्रिकेटमध्ये कुठेही स्थान नसायला हवे. क्रिकेट पुन्हा एकदा आदर्श खेळ म्हणून जगापुढे असावा.’

टॅग्स :स्टीव्हन स्मिथचेंडूशी छेडछाड