Join us

Bad News : भारत-श्रीलंका सामन्यावर पावसाचे सावट

सध्याच्या घडीला गुवाहाटीमध्ये १२ डिग्री एवढे तापमान आहे. जर पाऊस पडला तर या तापमानामध्ये अजून घट होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे फलंदाजांना प्रथम फलंदाजी करताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 14:55 IST

Open in App
ठळक मुद्देमैदानातील पाणी कसे आणि किती वेळात बाहेर काढले जाणार, यावर सामना किती षटकांचा होणार हे अवलंबून असेल.

गुवाहाटी : नववर्षातील भारताचा पहिला सामना श्रीलंकेबरोबर होणार आहे. भारत विरुद्ध श्रीलंका हा सामना ५ जानेवारीला गुवाहाटी येथे खेळवण्यात येणार आहे. पण या सामन्याबाबत एक वाईट बातमी आली आहे. या सामन्यावर पावसाचे सावट असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे सामना किती षटकांचा खेळवायचा, यावर विचार करायला चाहते सुरु झाले आहेत.

सामन्यादरम्यान पाऊस पडला की, किती षटकांचा सामना खेळवायचा हा सर्वात महत्वाचा प्रश्न सर्वांनाच पडलेला असतो. कारण त्यावर सामन्याचा वेग अवलंबून असतो. पाऊस पडल्यावर खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करणारी असते.

गुवाहाटीमध्ये सध्याच्या घडीला चांगलीच थंडी पडली आहे. सध्याच्या घडीला गुवाहाटीमध्ये १२ डिग्री एवढे तापमान आहे. जर पाऊस पडला तर या तापमानामध्ये अजून घट होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे फलंदाजांना प्रथम फलंदाजी करताना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

रविवारी दिवसबर हलक्या सरी पडतील आणि दुपारी चांगलाच पाऊस येईल, असे हवामान खात्याने वर्तवले आहे. त्यामुळे जर दिवसभर हलक्या सरी जरी आल्या तरी वातावरण चांगलेच थंड होऊ शकते. त्याचबरोबर मैदानातील पाणी कसे आणि किती वेळात बाहेर काढले जाणार, यावर सामना किती षटकांचा होणार हे अवलंबून असेल.

बारासपारा स्टेडियमची क्षमता ३९,५०० प्रेक्षकांची आहे. त्यात २७००० तिकीटे पहिलेच विकली आहेत. सैकिया पुढे म्हणाले,‘नागरिक नाताळ व नव्या वर्षाच्या जल्लोषात मग्न होते आणि आम्हाला शेवटच्या क्षणी तिकीट विक्रीची आशा आहे.’ दुसरा टी२० सामना ७ जानेवारी रोजी इंदूरला, तर तिसरा व अंतिम सामना १० जानेवारी रोजी पुण्यामध्ये खेळला जाणार आहे.

श्रीलंकेचा संघ गुवाहाटीमध्ये दाखल; भारताविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी सराव सुरु

अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाच्या नेतृत्वाखाली श्रीलंका क्रिकेट संघ भारताविरुद्ध तीन टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळण्यासाठी कडक सुरक्षा व्यवस्थेत गुरुवारी येथे दाखल झाला. सुधारीत नागरिकत्व कायद्याविरुद्ध (सीएए) सुरू असलेल्याप्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर श्रीलंका संघाला कडक सुरक्षा व्यवस्थेत हॉटेलमध्ये आणण्यात आले.भारतीय संघ रविवारी होणाऱ्या लढतीसाठी शुक्रवारी येथे पोहोचण्याची शक्यता आहे. आसाम क्रिकेट संघटनेच्या (एसीए) एका पदाधिकाºयाने सांगितले की,‘दोन्ही संघांसाठी पर्यायी सराव सत्र आहे. सुरुवातीला श्रीलंका संघ सराव करणार आहे आणि सायंकाळी भारतीय संघ.’ आसाममध्ये सीएएविरुद्ध डिसेंबर महिन्यात मोठ्या पातळीवर विरोध प्रदर्शन झाले होते. त्यामुळे रणजी व १९ वर्षांखालील सामने प्रभावित झाले होते.एसीएचे सचिव देवजित सैकिया म्हणाले,‘आता येथील परिस्थिती सामन्य असून राज्यातील पर्यटन पूर्णपणे सुरू आहे. आम्ही १० जानेवारीपासून ‘खेलो इंडिया खेलो’ स्पर्धेचे यजमानपद भूषवित असून त्यात जवळजवळ सात हजार खेळाडू सहभागी होत आहेत. हा प्रदेश देशातील अन्य प्रदेशांप्रमाणे सुरक्षित आहे. राज्य सरकार सुरक्षा व्यवस्था बघत असून कुठलीच अडचण नाही.’श्रीलंका संघ : लसिथ मलिंगा (कर्णधार), दानुष्का गुणतिलका, अविष्का फर्नांडो, अँजेलो मॅथ्यूज, दासुन शनाका, कुसाल परेरा, निरोशन डिकवेला, धनंजय डिसिल्वा, इसुरू उडाना, भानुका राजपक्षे, ओशदा फर्नांडो, वानिंदू हसरंगा, लाहिरू कुमार, कुसाल मेंडिस, लक्षण संदाकन व कासून राजिता.

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंका