Join us  

Baby AB Dewald Brewis, IPL 2022: बेबी एबीचा विक्रमी सिक्सर; कौतुक करण्यासाठी Sachin Tendulkar अन् Rohit Sharma थेट मैदानात (Video)

बेबी एबीने पंजाब विरूद्ध २५ चेंडूत ठोकल्या ४९ धावा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 4:13 PM

Open in App

Baby AB Dewald Brewis Sachin Tendulkar Rohit Sharma, IPL 2022: मुंबई इंडियन्सने बुधवारी हंगामातील सलग पाचवा सामना गमावला. पंजाब किंग्जने मुंबईला १२ धावांनी पराभूत केले. पंजाबने प्रथम फलंदाजी करताना शिखर धवन (७०) आणि मयंक अग्रवाल (५२) यांच्या जोरावर १९८ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बेबी एबी डेवाल्ड ब्रेविस (४९) याने तुफान फटकेबाजी केली. त्याच्या फटकेबाजीनंतर चक्क कर्णधार रोहित शर्मा आणि मेंटॉर सचिन तेंडुलकरदेखील मैदानात येऊन त्याची पाठ थोपटून गेले.

--

पंजाबच्या फलंदाजांनी धुलाई केल्यानंतर मुंबईच्या संघाला १९९ धावांचे मोठे आव्हान मिळाले. या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित शर्मा २७ धावांवर बाद झाला. त्यानंतर बेबी एबीने Mumbai Indians चा माजी गोलंदाज राहुल चहर याला धु धु धूतला. त्याच्या षटकात बेबी एबीने दुसऱ्या चेंडूवर चौकार आणि पुढील चार चेंडूंवर चार षटकार खेचले. त्यातच ११२ मीटर लांब विक्रमी षटकाराचा समावेश होता. यंदाच्या हंगामातील तो सर्वात लांबचा षटकार ठरला. राहुल चहरची ती एक ओव्हर पंजाबला तब्बल २९ धावांना पडली. या फटकेबाजी नंतर खुद्द सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा स्ट्रॅटेजिक टाइम आऊट दरम्यान मैदानात आले आणि बेबी एबीची पाठ थोपटली.

बेबी एबीचा ११२ मीटर लांब षटकार-

--

--

--

--

 

दरम्यान, सामन्याबाबत बोलायचे झाल्यास, कर्णधार मयंक अग्रवालने ३२ चेंडूत ५२ तर शिखर धवनने ५० चेंडूत ६० धावांची शानदार खेळी करत संघाला १९८ धावांपर्यंत मजल मारून दिली. या आव्हानाचा पाठलाग करताना बेबी एबी (४९), सूर्यकुमार यादव (४३) आणि तिलक वर्मा (३७) यांनी झुंज दिली. पण मुंबईचे प्रयत्न १२ धावांनी तोकडेच पडले.

टॅग्स :आयपीएल २०२२मुंबई इंडियन्ससचिन तेंडुलकररोहित शर्मा
Open in App