बाबर आझम ५० शतकांचा 'विराट' विक्रम मोडू शकतो; पाकिस्तानच्या माजी खेळाडूला विश्वास

वन डे क्रिकेटच्या इतिहासात शतकांचे अर्धशतक झळकावणारा विराट कोहली पहिला खेळाडू ठरला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2023 03:01 PM2023-11-17T15:01:51+5:302023-11-17T15:02:48+5:30

whatsapp join usJoin us
 Babar Azam can break Virat Kohli's record of 50 centuries in ODIs, says former Pakistan player Kamran Akmal  | बाबर आझम ५० शतकांचा 'विराट' विक्रम मोडू शकतो; पाकिस्तानच्या माजी खेळाडूला विश्वास

बाबर आझम ५० शतकांचा 'विराट' विक्रम मोडू शकतो; पाकिस्तानच्या माजी खेळाडूला विश्वास

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

वन डे क्रिकेटच्या इतिहासात शतकांचे अर्धशतक झळकावणारा विराट कोहली पहिला खेळाडू ठरला. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विश्वविक्रम मोडत किंग कोहलीने 'विराट' कामगिरी केली. वन डे विश्वचषक २०२३ मधील पहिल्या उपांत्य सामन्यात विराटने न्यूझीलंडविरूद्ध झंझावाती शतक झळकावले. मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सामना पार पडला, ज्यात यजमान संघाने ७० धावांनी मोठा विजय मिळवला. सचिनच्या घरच्या मैदानावरच त्याचा विश्वविक्रम मोडून विराट कोहलीने ऐतिहासिक कामगिरी केली. अशातच विराट कोहलीच्या शतकांचा विक्रम केवळ बाबर आझम मोडू शकतो असा विश्वास पाकिस्तानच्या माजी खेळाडूने व्यक्त केला आहे. 

दरम्यान, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ४६३ सामन्यांमध्ये ४९ वन डे शतके झळकावली. तर कोहलीने २९१ सामन्यांमध्ये ५० शतके झळकावून भीमपराक्रम केला. वन डे क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक शतके झळकावणाऱ्यांच्या यादीत भारतीय कर्णधार रोहित शर्मा (३१) तिसऱ्या स्थानावर आहे. विराटने इतिहास रचल्यानंतर पाकिस्तानचा माजी खेळाडू कामरान अकमलने विराटचे कौतुक केले. तसेच पाकिस्तानचा मावळता कर्णधार बाबर आझम नक्कीच कोहलीच्या ५० शतकांचा विक्रम मोडू शकतो, असेही अकमलने म्हटले. 

कामरान अकमलची भविष्यवाणी 
एका टीव्ही शोमध्ये बोलताना कामरान अकमलने म्हटले, "विराट कोहलीचा ५० शतकांचा विश्वविक्रम केवळ आघाडीचे फलंदाज मोडू शकतात. आमच्याकडे बाबर आझम असून तो असे करू शकतो. कारण तो टॉप-३ मध्ये खेळतो. तर, भारताकडे शुबमन गिल आहे तो देखील या विक्रमाकडे कूच करू शकतो."

रोहितसेनेचा विजयरथ कायम 
न्यूझीलंडला पराभूत करून भारतीय संघाने फायनलचे तिकिट मिळवले आहे. दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेता संघ १९ तारखेला भारतासोबत अंतिम सामना खेळेल. मोहम्मद शमीने ५७ धावा देत ७ बळी घेतले अन् संघाला विजय मिळवून दिला. प्रथम फलंदाजी करताना भारताने ३९७ धावांचा डोंगर उभारला. विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांच्या शतकी खेळीच्या जोरावर भारताने निर्धारित ५० षटकांत ४ बाद ३९७ धावा केल्या. ३९८ धावांच्या तगड्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडने चांगली सुरूवात केली. पण, मोहम्मद शमी किवी संघासाठी काळ ठरला अन् त्याने सुरूवातीलाच दोन मोठे झटके दिले. त्यानंतर डॅरिल मिचेल आणि केन विल्यमसन यांनी भागीदारी नोंदवून भारतीय चाहत्यांच्या पोटात गोळा आणला. पण, पन्हा एकदा शमी एक्सप्रेसच्या स्विंगने न्यूझीलंडचा संघ चीतपट झाला आणि भारताने ७० धावांनी विजय साकारला. 

Web Title:  Babar Azam can break Virat Kohli's record of 50 centuries in ODIs, says former Pakistan player Kamran Akmal 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.