Join us  

ICC Poll : विराट कोहलीला धक्का; पाकिस्तानचा बाबर आझम ठरला 'Cover Drive King'!

पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम ( Babar Azam) याची नेहमीच विराट कोहली ( Virat Kohli), जो रुट आणि केन विलियम्सन या आघाडीच्या फलंदाजांशी तुलना होते.

By स्वदेश घाणेकर | Published: February 08, 2021 9:38 AM

Open in App

पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम ( Babar Azam) याची नेहमीच विराट कोहली ( Virat Kohli), जो रुट आणि केन विलियम्सन या आघाडीच्या फलंदाजांशी तुलना होते. याच बाबर आझमनं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( ICC) एका पोलमध्ये या सर्वांवर मत केल आहे. ICCनं 'Cover Drive King' या पुरस्कारासाठी पोल घेतला होता, त्यातील २६०पैकी १४३ मतं पाकिस्तानी कर्णधाराच्या पारड्यात पडली. बाबरला ४६ टक्के मत पडली आणि ०.०१ टक्क्यांच्या फरकानं विराट दुसऱ्या स्थानावर राहिला. न्यूझीलंडचा कर्णधार विलियम्सन ७.१ टक्क्यांसह तिसऱ्या, तर इंग्लंडच्या कसोटी संघाचा कर्णधार रूट १.१ टक्क्यांसह चौथ्या स्थानावर राहिला.  

इंग्लंडचा कर्णधार या पोलमध्ये अखेरच्या स्थानावर असला तरी भारताविरुद्धच्या चेन्नई कसोटीत खणखणीत द्विशतक झळकावून इंग्लंडला पहिल्या डावात ५७८ धावा उभ्या करून दिल्या. प्रत्युत्तरात भारताचे ६ फलंदाज २६२ धावांत माघारी परतले आहेत आणि फॉलोऑन टाळण्यासाठी टीम इंडियाला आणखी १२० धावा कराव्या लागणार आहेत. चेतेश्वर पुजारा विचित्र पद्धतीनं झाला बाद; इंग्लंडच्या खेळाडूंनाही बसेना विश्वास, Video 

टीम इंडियावरील फॉलोऑनचे संकट अधिक गडद होत चाललं असताना रिषभ पंत ( Rishabh Pant) व चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) पुन्हा एकदा संकटमोचक म्हणून धावून आले. या दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजांचा खंबीरपणे सामना करताना टीम इंडियाच्या डावाला आकार दिला.  रिषभनं ८८ चेंडूंत ९ चौकार व ५ षटकारांसह ९१ धावा केल्या.  चेतेश्वर पुजारा १४३ चेंडूंत ७३ धावा करून माघारी परतला. पुजारा व रिषभ यांनी ११९ धावांची भागीदारी केली.  वेस्ट इंडिजचा नादच करायचा न्हाय...!; पदार्पणातच कायले मेयर्सचा वर्ल्ड रेकॉर्ड अन् संघाचा रोमहर्षक विजय

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडआयसीसीविराट कोहली