Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!

Ayush Mhatre: पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा उदयोन्मुख फलंदाज आयुष म्हात्रेने आपल्या बॅटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2026 22:26 IST

Open in App

पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यात चेन्नईचा उदयोन्मुख फलंदाज आयुष म्हात्रेने आपल्या बॅटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या सामन्यात आयुष म्हात्रेने वादळी अर्धशतक झळकावले.  या सामन्यात त्याने संघाला सावरले नाही, तर १६९.७७ चा स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. आयुषच्या या आक्रमक फलंदाजीमुळे पंजाब किंग्सचे गोलंदाज हतबल झाल्याचे पाहायला मिळाले. 

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला उतरलेल्या चेन्नईची सुरुवात खराब झाली होती. स्टार फलंदाज संजू सॅमसन अवघ्या ७ धावांवर बाद झाला. मात्र, त्यानंतर आयुष म्हात्रेने मैदानाचा ताबा घेतला. त्याने पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेत झंझावाती अर्धशतक झळकावले. या सामन्यात आयुष म्हात्रेने १६९.७६ स्ट्राइक रेटने ४३ चेंडूंमध्ये ७३ धावांची खेळी केली, ज्यात पाच षटकार आणि सहा षटकारांचा समावेश आहे.

आयुष्य म्हात्रेची इतिहासात नोंद

आयुष म्हात्रेने वयाच्या १८ वर्षे आणि २६१ व्या दिवशी एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर अर्धशतक पूर्ण केले. या कामगिरीसह तो चेपॉकच्या मैदानावर आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. आयुषचे हे आयपीएल कारकिर्दीतील दुसरे अर्धशतक आहे. शिवाय,  वयाच्या १९ व्या वर्षापूर्वी आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५० पेक्षा जास्त धावा करण्याच्या बाबतीत आयुषने आता पृथ्वी शॉची बरोबरी केली आहे. दोघांच्या नावावर आता प्रत्येकी २ अर्धशतके आहेत. या यादीत वैभव सूर्यवंशी (३ अर्धशतकी खेळी) सध्या अव्वल स्थानावर आहे.

चेन्नईचे पंजाबसमोर २१० धावांचे लक्ष्य

या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईच्या संघाने २० षटकात पाच विकेट्स गमावून २०९ धावा केल्या. चेन्नईकडून आयुष्य म्हात्रे, शिवम दुबे (२७ चेंडू ४५) आणि सरफराज खान (१२ चेंडू ३२ धावा) यांनी महत्त्वाचे योगदान दिले. पंजाबकडून विजयकुमार वैशाखने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या. तर, युजवेंद्र चहल, मार्को जान्सेन आणि झेवियर बार्टलेट यांना प्रत्येकी एक-एक विकेट्स मिळाली.

English
हिंदी सारांश
Web Title : IPL 2026: Ayush Mhatre's explosive innings against Punjab!

Web Summary : Ayush Mhatre's blistering half-century propelled Chennai against Punjab in IPL 2026. His aggressive batting, featuring five sixes and six fours, yielded 73 runs off 43 balls. The young batsman also achieved a record as the youngest to score an IPL fifty at Chepauk.
टॅग्स :आयपीएल २०२६चेन्नई सुपर किंग्सपंजाब किंग्सऑफ द फिल्ड