Join us
Daily Top 2Weekly Top 5

आयुष म्हात्रेची फिफ्टी, वैभव सूर्यवंशीची बॅटही तळपली, युवा टीम इंडियाने ८१ चेंडूत संपवली वनडे मॅच

पावसाच्या बॅटिंगमुळे ३७ षटकांचा खेळ, न्यूझीलंडचा डाव १३५ धावांत आटोपला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 20:07 IST

Open in App

आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतील यंदाच्या हंगामातील साखळी फेरीत विजयी हॅटट्रिकचा डाव साधला आहे. या दमदार कामगिरीसह युवा टीम इंडियाने यंदाचा हंगामातील जेतेपदाची आपली दावेदारी अधिक भक्कम केली आहे. अमेरिका आणि बांगलादेशला दणका दिल्यावर तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडला एकतर्फी मात दिली. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

पावसाच्या बॅटिंगमुळे ३७ षटकांचा खेळ, न्यूझीलंडचा डाव १३५ धावांत आटोपला

भारत-न्यूझीलंड अंडर १९ संघातील सामना  बुलावायो येथील क्वीन्स स्पोर्ट्स क्लबच्या मैदानात खेळवण्यात आला. आयुष म्हात्रेनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याच निर्णय घेतला. पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना प्रत्येकी ३७-३७ षटकांचा खेळवण्यात आला. पण न्यूझीलंडच्या संघाला ही षटकाही पूर्ण खेळता आली नाहीत. आरएस अंब्रिश आणि हेनिल पटेल यांच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझीलंडचा संघ ३६.२ षटकात १३५ धावांवर आटोपला. अंब्रिशनं युवा टीम इंडियाकडून सर्वाधिक ४  तर हेनिल पटेल याने ३ विकेट्सचा डाव साधला. याशिवाय खलिन पटेल. मोहम्मद एनान आणि कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतली.

IPL 2026 : MS धोनी तयारीला लागला! नेट प्रॅक्टिस वेळी दिसली खास झलक; व्हिडिओ होतोय व्हायरल

आयुष म्हात्रेची फिफ्टी, वैभव सूर्यवंशीची बॅटही तळपली, युवा टीम इंडियाने ८१ चेंडूत संपवली वनडे मॅच 

न्यूझीलंडने दिलेल्या माफक धावसंख्येचा पाठलाग करताना एरॉन जॉर्ज आणि वैभव सूर्यवंशी जोडीनं भारताच्या डावाची सुरुवात केली. धावफलकावर ११ धावा असताना एरॉन जॉर्ज ७ धावा करून माघारी फिरला. त्यानंतर आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यवंशी जोडी जमली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ३९ चेंडूत  ७६ धावांची भागीदारी रचली. वैभव सूर्यवंशी २३ चेंडूत ४० धावांवर बाद झाल्यावर आयुष म्हात्रेनं U19 वर्ल्ड कप स्पर्धेतील आपले पहिले अर्धशतक साजरे केले. त्याने २७ चेंडूत २ चौकार आणि ६ षटकारांच्या मदतीने ५३ धावा केल्या.  विहान मल्होत्रा  १७ (१३) आणि वेदांत त्रिवेदी १३ (१२)यांनी १४ व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर संघाचा विजय निश्चित केला.

 

English
हिंदी सारांश
Web Title : India U19 Dominates: Mhatre's Fifty, Suryavanshi Shines, Clinches Victory

Web Summary : India U19 secured a dominant victory against New Zealand in the U19 World Cup. Ayush Mhatre's fifty and Vaibhav Suryavanshi's explosive batting led the team to an easy win after restricting New Zealand to a low score. India achieved a hat-trick of wins.
टॅग्स :19 वर्षांखालील वन डे वर्ल्ड कपआयुष म्हात्रेवैभव सूर्यवंशी