ठळक मुद्देगेलला नाचताना पाहून धवन आणि रोहित यांनाही ठेका धरावासा वाटला.
मुंबई : ' द युनिव्हर्स बॉस ' ही उपाधी मिळाली आहे ती धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेलला. आयपीएलमध्ये गेलची तुफानी फटकेबाजी आपण साऱ्यांनीच पाहिली. पण आयपीएलनंतर झालेल्या एका क्रिकेटच्या पुरस्कार सोहळ्यात गेलने जो डान्स केला तो फारच गाजला.
एका पुरस्काराच्या कार्यक्रमात भारतीय खेळाडूंसह गेललाही आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात गेल खास भारतीय पोषाखामध्ये आला होता. गेलला जेव्हा या कार्यक्रमात स्टेजवर बोलावण्यात आले तेव्हा साऱ्यांनीच त्याला डान्स करण्यास सांगितले. त्यावेळी स्टेजवर गेलसह शिखर धवन आणि रोहित शर्माही उपस्थित होते.
गेलने सुरुवातीला स्टेजवर भांगडा करायला सुरुवात केली. गेलला नाचताना पाहून धवन आणि रोहित यांनाही ठेका धरावासा वाटला. त्यामुळे गेलसह रोहित आणि धवन यांनी ठेका धरला आणि त्यांचा हा डान्स चांगलाच गाजला.