Join us

ऑस्ट्रेलियाच्या ' या ' महिला क्रिकेटपटूने जाहीर केले आपले समलैंगिक संबंध

ऑस्ट्रेलियाच्या संसदेने प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर वेगवान गोलंदाज मेगन स्कटने सोशल मीडियावर आपले समलैंगिक संबंध जाहीर केले आहेत. आपली पार्टनर जेस होलोओकेबरोबर आपण लग्न करणार असल्याचेही मेगनने सांगितले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2018 16:36 IST

Open in App
ठळक मुद्देगेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यावर मेगनने आपण जेसबरोबर लग्न करणार असल्याचे जाहीर केले होते.

सिडनी : समलैंगिक विवाह, हा विषय सध्याच्या घडीला संपूर्ण विश्वामध्ये चर्चेचा विषय आहे. ऑस्ट्रेलियाच्या संसदेमध्ये 2004 सालापासून या विषयावर प्रस्वाव मांडला गेला होता. पण तब्बल 22 वेळा हा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. अखेर 2017 साली या प्रस्तावावर मतदान घेण्यात आलं आणि जवळपास 61 टक्के लोकांनी समलैंगिक विवाहाच्या बाजूने मतदान केलं. त्यानंतर संसदेमध्ये या प्रस्तावाला मंजूरी देण्यात आली. या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यावर ऑस्ट्रेलियाच्या या महिला क्रिकेटपटूने आपले समलैंगिक संबंध जगजाहीर केले आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या संसदेने प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर वेगवान गोलंदाज मेगन स्कटने सोशल मीडियावर आपले समलैंगिक संबंध जाहीर केले आहेत. आपली पार्टनर जेस होलोओकेबरोबर आपण लग्न करणार असल्याचेही मेगनने सांगितले आहे.

 

गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये या प्रस्तावाला मंजूरी मिळाल्यावर मेगनने आपण जेसबरोबर लग्न करणार असल्याचे जाहीर केले होते. सोशल मीडियावर मेगनने लिहिले आहे की, " जी गोष्ट व्हायला हवी, असं मला वाटत होतं, तीच इच्छा हजारो जणांची होती. आता मला सशक्तीकरण झाल्यासारखे वाटत आहे. आता मी जेसबरोबर लग्न करू शकते. "

मेगनने 2012 साली ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघात पदार्पण केले होते. एक वेगवान गोलंदाज म्हणून मेगनने नाव कमावले आहे. जेस ही ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघात अष्टपैलू खेळाडू आहे.

टॅग्स :क्रिकेट