Join us

ऑस्ट्रेलियाचा पाकवर एकतर्फी विजय

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी नियमित गडी बाद करताच पाकिस्तानने सहा गड्यांच्या मोबदल्यात १९० पर्यंत मजल गाठली.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2022 05:59 IST

Open in App

माऊंट मोंगेनुई : सलामीची फलंदाज एलिसा हिलीच्या शानदार फटकेबाजीपाठोपाठ गोलंदाजांच्या शानदार कामगिरीच्या बळावर सहावेळेचा चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने आयसीसी महिला वन डे विश्वचषकाच्या सामन्यात मंगळवारी पाकिस्तानचा सात गडी राखून पराभव केला. 

ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी नियमित गडी बाद करताच पाकिस्तानने सहा गड्यांच्या मोबदल्यात १९० पर्यंत मजल गाठली.  बिस्माह महारुफ नाबाद ७८ आणि अष्टपैलू आलिया रियाज ५३ यांचा अपवाद वगळता एकही फलंदाज धावा काढू शकली नाही. स्टार यष्टिरक्षक एलिसा हिलीने ७२ धावांचे योगदान देत ऑस्ट्रेलियाला १५.३  षटके आधी विजय मिळवून दिला. 

याआधी इंग्लंडला हरविणारा ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत अव्वल स्थानावर असून, पाकने दोन सामने गमावल्यामुळे हा संघ तळाच्या स्थानावर आहे. पहिल्या सामन्यात भारताने पाकचा पराभव केला होता. हिली आणि राचेल हेन्स (३४) यांनी ६० धावांची भागीदारी केली. कर्णधार मेग लानिंग हिने ३५ धावांचे योगदान दिले. 

Open in App