Join us  

क्रिकेट सोडून 'तो' चाललेला योग प्रशिक्षक बनायला...

चेंडू कुडतडण्या प्रकणात दोषी आढळलेला ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू कॅमरन बेनक्रॉफ्ट पूर्णपणे बदलला असून योग प्रशिक्षक बनण्यासाठी तो क्रिकेट सोडण्याच्या विचारात होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 4:31 PM

Open in App

सिडनीः चेंडू कुडतडण्या प्रकणात दोषी आढळलेला ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू कॅमरन बेनक्रॉफ्ट पूर्णपणे बदलला असून योग प्रशिक्षक बनण्यासाठी तो क्रिकेट सोडण्याच्या विचारात होता. दक्षिण आफ्रिका येथील कसोटी मालिकेत चेंडू कुडतडणाऱ्या बॅनक्रॉफ्टला नऊ महिन्यांच्या बंदीच्या शिक्षेला सामोरे जावे लागले होते. याच प्रकरणात तत्कालिन कर्णधार स्टीव्हन स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर यांना प्रत्येकी एका वर्षांची शिक्षा झाली आहे. बॅनक्रॉफ्टवरील बंदी डिसेंबर महिन्याअखेरीस संपणार आहे.

त्या प्रकरणानंतर आतापर्यंत आयुष्यात किती बदल झाला याचा उल्लेख बॅनक्रॉफ्टने स्वतःला लिहिलेल्या पत्रात केला आहे. प्रशिक्षक जस्टिन लँगर आणि अॅडम व्होजेस यांचा बॅनक्रॉफ्ट याच्यावर प्रभाव आहे. तो म्हणाला,'' क्रिकेटपासून दूर गेल्यानंतर योग हा आयुष्याचा भाग बनला आहे. त्यामुळे योग प्रशिक्षक बनण्यासाठी क्रिकेट सोडण्याचीही तयारी होती. क्रिकेट हे माझ्यासाठी नाही. क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन करू शकतो?'' 30 डिसेंबरला बॅनक्रॉफ्ट बिग बॅश ट्वेंटी-20 लीगमध्ये बंदीनंतरचा पहिला सामना खेळणार आहे. 

दरम्यान, स्मिथला आपली चूक उमगली आहे. त्यामुळे आता तो भावुक झाला असून मला पुन्हा खेळायचे आहे, असे तो म्हणत आहे. आयपीएलमधून तो पुनरागमन करण्यासाठी उत्सुक आहे. आयपीएलच्या सुरुवातीला त्याच्यावरील बंदी संपणार आहे. आयपीएलमध्ये तो राजस्थान रॉयल्सकडून खेळणार आहे. 

 

टॅग्स :आॅस्ट्रेलिया