Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND vs AUS 3rd Test : 7 वर्षीय आर्ची शिलरला ग्रीन कॅप प्रदान, पाहा व्हिडीओ

बॉक्सिंग डे कसोटीत सात वर्षाय आर्ची शिलरचा ऑस्ट्रेलिया संघात सहाय्यक कर्णधार म्हणून समावेश करण्यात आला होता.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2018 09:42 IST

Open in App

मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : बॉक्सिंग डे कसोटीत सात वर्षाय आर्ची शिलरचा ऑस्ट्रेलिया संघात सहाय्यक कर्णधार म्हणून समावेश करण्यात आला होता. लेग स्पिनर असलेल्या शिलरचे सामन्यापूर्वा ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनने ग्रीन कॅप देऊन स्वागत करण्यात आले. त्याचे अन्य खेळाडूंनीही स्वागत केले. 

तीन महिन्यांचा असताना शिलरला हृदयाचा एक गंभीर आजार झाल्याचे निदान झाले. तीन महिन्यांच्या असल्यापासून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. 22 डिसेंबरला त्याचा वाढदिवस साजरा करण्यात आला आणि त्याने विराट कोहलीला बाद करण्याची इच्छा व्यक्त केली होती. म्हणून ऑस्ट्रेलियन संघाने त्याचा संघात समावेश केला. पाहा व्हिडीओ.. शिलरने संघाच्या सराव सत्रातही सहभाग घेतला. होता. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाबीसीसीआय