Join us  

ऑस्ट्रेलियाच्या संघाने मैदानात प्यायली बीअर आणि त्यानंतर स्मिथने केलं असं काही...

बीअर प्यायल्यावर ऑस्ट्रेलियाचा सर्वात फॉर्मात असलेल्या स्टीव्हन स्मिथने असं काही केलं की, तो चांगलाच ट्रोल व्हायला लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 5:25 PM

Open in App

मँचेस्टर, अ‍ॅशेस 2019 : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या अ‍ॅशेस सामन्यात ऑस्ट्रेलियाने दमदार विजय मिळवला. या विजयानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाने रात्री मैदानातच सेलिब्रेशन केले. या सेलिब्रेशनदरम्यान ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी बीअर प्यायली. बीअर प्यायल्यावर ऑस्ट्रेलियाचा सर्वात फॉर्मात असलेल्या स्टीव्हन स्मिथने असं काही केलं की, तो चांगलाच ट्रोल व्हायला लागला.

 

या सेलिब्रेशनमध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी गाणी गायली आणि डान्सही केला. यावेळी स्मिथ हा यामध्येही भन्नाट फॉर्मात होता. स्मिथ आणि फिरकीपटू नॅथन लिऑन यांनी पुढे येऊन वेगळाच डान्स करायला सुरुवात केली. यावेळी स्मिथने एक चष्मा घातल्याचे पाहायला मिळाले. स्मिथने घातलेला चष्मा ही एक फॅशन असेल, असे तुम्हाला वाटले असेल. पण तसे नाही. इंग्लंडने जेव्हा सामना जिंकला होता. तेव्हा बेन स्टोक्स हा त्यांच्या विजयाचा शिल्पकार होता. स्टोक्सला त्यावेळी इंग्लंडचा अकरावा फलंदाज जॅक लिचने सुयोग्य साथ दिली होती. त्यानंतर स्टोक्सने जॅकला सांगितले होते की, तुला मी आयुष्यबर चष्मा पुरवत राहीन. या गोष्टीची खिल्ली स्मिथने यावेळी उडवल्याचे पाहायला मिळाले.

पॅट कमिन्सने दुसऱ्या डावात केलेल्या भेदक माºयाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने चौथ्या अ‍ॅशेस कसोटी सामन्यात यजमान इंग्लंडचा पाचव्या दिवशी १८५ धावांनी धुव्वा उडवला. या दणदणीत विजयासह ऑस्ट्रेलियाने पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. मालिकेतील पाचवा व अखेरचा कसोटी सामना १२ स्पटेंबरपासून ओव्हल येथे खेळविण्यात येईल. मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी यजमानांना हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या ३८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा दुसरा डाव ९१.३ षटकात १९७ धावांत संपुष्टात आला. कमिन्सने ४३ धावांत ४ प्रमुख फलंदाज बाद करत इंग्लंडचे कंबरडे मोडले. जोश हेजलवूड आणि नॅथन लियॉन यांनीही प्रत्येकी २ बळी घेत चांगला मारा केला. इंग्लंडकडून सलामीवीर जो डेन्ली याने १२३ चेंडूत ६ चौकारांसह ५३ धावा करत एकाकी झुंज दिली. कर्णधार जो रुट भोपळाही न फोडता बाद झाला, तर तिसºया सामन्यात निर्णायक शतक झळकावून इंग्लंडला एकहाती विजयी मिळवून देणारा बेन स्टोक्स केवळ एक धाव काढून परतला.

टॅग्स :स्टीव्हन स्मिथअ‍ॅशेस 2019बेन स्टोक्सआॅस्ट्रेलियाइंग्लंड