शेन वॉर्नवर घाणेरडे मेसेज पाठवण्याचा, होटेलमध्ये बोलावण्याचा आरोप; मॉडलनं स्वतःच केला भांडाफोड

वॉर्न यापूर्वीही त्याच्या वर्तनामुळे वादात राहिला आहे. अफेअर्स आणि सेक्स स्कँडल्समुळे त्यांचे लग्नही मोडले आहे. शेन वॉर्नने ऑस्ट्रेलियासाठी 300 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2021 07:36 PM2021-11-05T19:36:04+5:302021-11-05T19:37:24+5:30

whatsapp join usJoin us
Australian cricket legend shane warne slammed by reality tv star jessika power | शेन वॉर्नवर घाणेरडे मेसेज पाठवण्याचा, होटेलमध्ये बोलावण्याचा आरोप; मॉडलनं स्वतःच केला भांडाफोड

शेन वॉर्नवर घाणेरडे मेसेज पाठवण्याचा, होटेलमध्ये बोलावण्याचा आरोप; मॉडलनं स्वतःच केला भांडाफोड

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जगातील महान फिरकीपटूंपैकी एक असलेला शेन वॉर्न नेहमीच वादात राहिला आहे. तो आताही पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी त्याच्यावर एक मॉडेल आणि टीव्ही अभिनेत्री जेसिका पॉवरने अश्लील मेसेज पाठविल्याचा गंभीर आरोप केला आहे. 52 वर्षीय वॉर्नच्या, अशा कृत्यामुळे जेसिकाने त्याला 'विक्षिप्त' म्हटले आहे. शेन वॉर्नच्या अशा कृत्याबद्दल एखाद्या महिलेने तक्रार करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वीही, वॉर्न त्याच्या अशा कृत्यांमुळे वादात सापडला आहे. एवढेच नाही, तर यामुळे त्यांचे लग्नही मोडले आहे. (Shane Warne slammed by reality tv star Jessika Power)

मॉडेलने शेन वॉर्नवर केले आहेत, अश्लील मेसेज पाठविण्याचे आरोप -
मॉडेल आणि टीव्ही अभिनेत्री जेसिकाने (Jessika Power) शेन वॉर्नने पाठविलेल्या मेसेजचा स्क्रीनशॉट इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यात वॉर्नकडून जेसिकाला होटेलच्या रूममध्ये भेटण्यासंदर्भात म्हणण्यात आले आहे. मेसेजमध्ये नकार आल्यानंतरही वॉर्नने मॉडेलला सलग अनेक मेसेज पाठविले आहेत. पॉवरने म्हटले आहे, की 'मी म्हणाले हा पागलपणा आहे. तुम्ही आणखी एक मेसेज पाठवत आहात यावर विश्वास बसत नाही.' जेसिकाने इंग्लिश रिअॅलिटी शो बिग ब्रदर व्हीआयपीमध्ये शेन वॉर्नवर आरोप केला आहे.

30 वर्षीय जेसिका पॉवरने म्हटले आहे, की शेन वॉर्नने (Shane Warne) तिला मेसेज केला होता. यात तो हॉटेलच्या रूममध्ये भेटण्याबद्दल बोलत होता. जेसिकाने सांगितले, की तिने वॉर्नला भेटण्यास नकार दिला. पण, नकार देऊनही वॉर्णने अनेक मेसेज केले.यापूर्वी ऑस्ट्रेलियन संघाने त्याच्यावर ड्रग्स घेतल्यामुळे एक वर्षाची बंदी घातली होती. आता जेसिकाच्या आरोपांनी त्यांच्यासमोर नव्या अडचणी निर्माण केल्या आहेत.

वॉर्न आणि वाद जुनाच संबंध -
वॉर्न यापूर्वीही त्याच्या वर्तनामुळे वादात राहिला आहे. अफेअर्स आणि सेक्स स्कँडल्समुळे त्यांचे लग्नही मोडले आहे. शेन वॉर्नने ऑस्ट्रेलियासाठी 300 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. जगातील महान लेग स्पिनर म्हणून तो ओळखला जातो. कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 708 विकेट्स आहेत. त्याचबरोबर एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने 293 विकेट्स मिळवल्या आहेत. याशिवाय, तो आयपीएल सीझन वनचे विजेतेपद पटकावणारा कर्णधार आहे. त्याने राजस्थान रॉयल्सला पहिली आयपीएल ट्रॉफी मिळवून दिली होती.

Web Title: Australian cricket legend shane warne slammed by reality tv star jessika power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.