Join us  

लिजेंड क्रिकेटर 'डीन जोन्स' यांचं मुंबईत अकाली निधन, क्रिकेट विश्वावर शोककळा

सध्या युएईमध्ये सुरू असलेल्या इंडियन प्रिमियर लीगसाठी कॉमेंटेटर म्हणून त्यांनी करार केला होता. त्याच पार्श्वभूमीवर ते मुंबईत आले होते. क्रिकेट विश्वात आणि भारतीय क्रिकेट प्रेमींमध्येही त्यांचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत.

By महेश गलांडे | Published: September 24, 2020 4:07 PM

Open in App

मुंबई - ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे माजी खेळाडू आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट कॉमेंटेटर डीन जोन्स यांचे निधन झाले आहे. डीन यांना ह्रदयविकाराच्या तीव्र धक्क्याने डीन यांचा मुंबईतमृत्यू झाल्याची माहिती आहे, ते 59 वर्षांचे होते. जॉन यांच्या अकाली निधनाने क्रिकेट विश्वात शोककळा पसरली आहे. ऑस्ट्रेलियन संघातील तत्कालीन सर्वात फिट खेळाडू असा त्यांचा नावलौकिक होता. 

सध्या युएईमध्ये सुरू असलेल्या इंडियन प्रिमियर लीगसाठी कॉमेंटेटर म्हणून त्यांनी करार केला होता. त्याच पार्श्वभूमीवर ते मुंबईत आले होते. क्रिकेट विश्वात आणि भारतीय क्रिकेट प्रेमींमध्येही त्यांचे मोठ्या प्रमाणात चाहते आहेत. मेलबर्न येथे जन्मलेल्या जोन्स यांनी 52 कसोटी सामने खेळले असून 3631 धावा केल्या आहेत. त्यामध्ये 216 ही त्यांची सर्वोत्तम धावसंख्या आहे. तसेच, 11 शतकेही त्यांच्या नावावर आहेत. 

टीम इंडियाचा माजी फलंदाज विरेंदर सेहवागने ट्विटरवर पोस्ट करुन डीन यांना श्रद्धांजली वाहिली आहे. डीन हे माझे सर्वात आवडते कॉमेंटेटर होते, त्यांच्या अकाली निधनाने मला अतिशय दु:ख झाले आहे. त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणी असून त्यांच्या निधनाच्या बातमीवर अद्यापही विश्वास बसत नसल्याचे सेहवागने म्हटले आहे. 

क्रिकेट हॉल ऑफ फेम

80 च्या दशकाच्या उत्तरार्धात आणि 90 च्या दशकाच्या प्रारंभी डीन जोन्सला जगातील सर्वोत्तम वन डे फलंदाजांपैकी एक मानले जात असे. फिरकीपटू आणि वेगवान गोलंदाज या दोघांविरूद्ध तो सर्वोत्कृष्ट फलंदाज होता. विकेट्स दरम्यान धावण्याच्या बाबतीत तो आश्चर्यकारक मानला जात असे. 2019 मध्ये त्याला ऑस्ट्रेलिया क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये स्थान देण्यात आले होते. 

टॅग्स :आॅस्ट्रेलियामृत्यूमुंबईआयपीएल