ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याने शुक्रवारी भारतीय वंशाची गर्लफ्रेंड विनी रमण हिच्याशी लग्न केले. मॅक्सवेल व रमण हे २७ मार्चला लग्न करणार असल्याचे वृत्त आधी प्रसिद्ध झाले होते आणि भारतीय पद्धतीने पुन्हा हे लग्न होणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, १८ मार्चला ही दोघं विवाहबंधनात अडकले. ग्लेन मॅक्सवेल व विनी रमण या दोघांनी सोशल मीडियावरून चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली.
दोन वेळा वर्ल्ड कप विजेता मॅक्सवेल लग्नामुळे पाकिस्तान दौऱ्यावर गेला नाही आणि तो आयपीएल २०२२च्या सुरूवातीच्या काही सामन्यांनाही मुकण्याची शक्यता आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने ऑस्ट्रेलियाच्य स्टार खेळाडूला आयपीएल २०२२साठी संघात रिटेन केले होते. ग्लेन मॅक्सवेल व विनी रमण हे एकमेकांना मागील चार वर्षांपासून ओळखतात आणि फेब्रुवारी २०२०मध्ये त्यांनी साखरपुडा उरकला होता. विनी ही मेलबर्न येथे राहणारी असून ती ऑस्ट्रेलियात फार्मासिस्ट आहे. कोरोना व्हायरसमुळे या दोघांना लग्न अनेकदा स्थगित करावे लागले होते. पण, अखेरीस ते लग्नबंधनात अडकले.
कोण आहे विनी रमण?२०१३ मध्ये मेलबर्न स्टार इव्हेंटमध्ये ग्लेन व विनी यांची पहिली भेट झाली. बरीच वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर २०२०मध्ये भारतीय पद्धतीनेच दोघांनी साखरपुडा गेला. अँचोरमॅन 2@ क्राऊन येथे त्यांची पहिली डेट झाली. ग्लेन मॅक्सवेलनं विनीला पहिलं I Love you म्हटले... भारतीय वंशाची विनी ऑस्ट्रेलियन नागरिक आहे आणि ती मेलबर्न येथे फार्मासिस्टची प्रॅक्टीस करते.. विनी ऑस्ट्रेलियातील तामिळ कुटुंबातील आहे. व्हिक्टोरिया येथील Mentone Girls Secondary College मध्ये तिने वैद्यकिय शिक्षण पूर्ण केले.