Join us

ऑस्ट्रेलियातील लहान मुलगा करतोय जसप्रीत बुमराची कॉपी, पाहा व्हिडीओ...

भारतीय संघाने यजमान ऑस्ट्रेलियाला चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 असे पराभूत केले.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 16:40 IST

Open in App

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने यजमान ऑस्ट्रेलियाला चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-1 असे पराभूत केले. या मालिकेत भारताच्या जसप्रीत बुमराने सर्वांना आपल्या गोलंदाजीने प्रभावीत केले. बुमराने मालिकेत एकूण 21 विकेट घेतल्या आणि त्याची गोलंदाजीची शैलीची खूप चर्चेत राहिली. 

आता एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे आणि त्यात ऑस्ट्रेलियातील एक लहान मुलगा बुमरासारखी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. आयसीसीने हा व्हिडीओ शेअर केला आहे. मायकल कर्टिन नामक नेटिझन्सनेही व्हिडीओ शेअर करताना जसप्रीत बुमराला टॅग केला. बुमरालाही या मुलाची अॅक्शन प्रचंड आवडली आणि त्याने तो व्हिडीओ रिट्विट केला. सोशल मीडियावर याआधीही बुमराच्या गोलंदाजीची कॉपी करणाऱ्या मुलाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. पाकिस्तानातील एक मुलगा बुमरासारखी गोलंदाजी करत होता.   

 

टॅग्स :जसप्रित बुमराहभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया