Join us

बांगलादेशविरुद्ध आॅस्ट्रेलिया मजबूत स्थितीत, दुस-या दिवसअखेर २ बाद २२५

वॉर्नर व हॅण्ड्सकोंब यांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावताना केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने बांगलादेशविरुद्ध दुस-या कसोटी सामन्याच्या दुस-या दिवशी पहिल्या डावात २ बाद २२५ धावांची मजल मारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 00:40 IST

Open in App

चटगाव : वॉर्नर व हॅण्ड्सकोंब यांनी वैयक्तिक अर्धशतके झळकावताना केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने बांगलादेशविरुद्ध दुस-या कसोटी सामन्याच्या दुस-या दिवशी पहिल्या डावात २ बाद २२५ धावांची मजल मारली आणि आपली स्थिती मजबूत केली. वॉर्नरने ४ चौकारांच्या मदतीने ८८ धावांची नाबाद खेळी करताना कर्णधार स्टीव्ह स्मिथसोबत (५८) दुसºया विकेटसाठी ९३ आणि हॅण्ड्सकोंबसोबत (नाबाद ६९) तिसºया विकेटसाठी १२७ धावांची अभेद्य भागीदारी केली. बांगलादेशने पहिल्या डावात ३०५ धावांची मजल मारली आहे.(वृत्तसंस्था)

टॅग्स :क्रिकेटआॅस्ट्रेलिया