Australia vs India 2nd ODI LIVE Streaming : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना अॅडलेड येथील ओव्हलच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघासाठी हा सामना 'करो वा मरो'ची लढत असेल. कारण पर्थच्या मैदानातील पहिल्या सामन्यात टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. मालिकेत विजय सलामी देत यजमान ऑस्ट्रेलियन संघाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून भारतीय संघ अॅडलेडच्या मैदानात १-१ बरोबरीचा डाव साधत मालिकेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील असेल. इथं एक नजर टाकुयात भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना कुठं अन् कसा पाहता येईल यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पुन्हा एकदा रोहित-विराटवर असतील सर्वांच्या नजरा
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील लढतीत पुन्हा एकदा सर्वांच्या नजरा या रोहित शर्मा आणि विराट कोहलीवर खिळलेल्या असतील. या दोन्ही दिग्गजांसाठी ऑस्ट्रेलिया दौऱा हा कदाचित शेवटचा ठरू शकतो. पहिल्या सामन्यातील फ्लॉप शोनंतर पुन्हा एकदा या जोडीवर धमाकेदार कामगिरीसह टीम इंडियाला संकटातून बाहेर काढण्याची मोठी जबाबदारी असेल.
IND vs AUS : 'मी सचिनपेक्षाही अधिक धावा केल्या असत्या!' पण… ऑस्ट्रेलियन क्रिकेटरचा मोठा दावा
IND vs AUS यांच्यातील सामना कधी अन् कुठं रंगणार?
बुधवारी, २३ ऑक्टोबरला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरी लढत अॅडलेडच्या ओव्हलच्या मैदानात खेळवण्यात येणार आहे. ऑस्ट्रेलियातील स्थानिक वेळेनुसार, हा सामना दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी सुरु होणार असला तरी भारतीय प्रमाणवेळेनुसार, या सामना सकाळी ९ वाजता सुरु होईल. अर्धा तास आधी सकाळी ८ वाजून ३० मिनिटांनी सामन्याची नाणेफेक होईल. शुबमन गिल वनडेतील पहिला टॉस जिंकत वनडेतील नाणेफेक गमावण्याचा सिलसिला खंडीत करणार का तेही पाहण्याजोगे असेल.
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना कसा पाहता येईल?
ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील भारतीय संघाच्या वनडे मालिकेच्या प्रसारणाचे हक्क हे स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. त्यामुळे स्टार स्पोर्ट्सच्या वेघवेगळ्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषेत या सामन्याचा क्रिकेट चाहते आनंद घेऊ शकतात. मोबाईलच्या माध्यमातून सामना पाहण्यासाठी जिओ स्टार अॅपवर LIVE स्ट्रेमिंग उपलब्ध असेल.