Join us

Australia Squad Against India : टीम इंडियाच्या २ कॅप्टनसमोर ऑस्ट्रेलियाकडून मार्श दाखवणार ताकद

३ सामन्यांच्या टी-वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघात ४ बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 12:25 IST

Open in App

Australia Squad Announced ODI And T20I Against India : भारतीय संघाविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाची घोषणा करण्यात आली आहे. स्टार फलंदाज मार्नस लाबुशेन याला एकदिवसीय संघातून डच्चू देण्यात आला असून मॅट रेनशॉ याला पहिल्यांदाच संघात संधी देण्यात आलीये. याशिवाय मिचेल स्टार्कही कमबॅकसाठी सज्ज झालाय.  मिचेल स्टार्कनं काही दिवसांपूर्वीच आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. नोव्हेंबर २०२४ मध्ये अखेरचा वनडे सामना खेळणारा स्टार्क टीम इंडिया विरुद्ध पुन्हा मैदानात उतरणार आहे. 

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

३ सामन्यांच्या टी-वनडे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघात ४ बदल

ऑस्ट्रेलियन संघाने भारताविरुद्धच्या ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी संघात चार बदल केले आहेत. मिचेल स्टार्कच्या कमबॅकसह  रेनशॉ, मॅट शॉट आणि मिच ओवन यांना संधी देण्यात आलीये. स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल आणि मार्कस स्टॉयनिसच्या निवृत्तीनंतर या तिघांची संघात एन्ट्री झालीये. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातील फ्लॉप शोमुळे मार्नस लाबुशेनचा पत्ता कट झालाय. पॅट कमिन्स अजूनही दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे वनडेत मिचेल मार्श हाच ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व करताना दिसेल. 

IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन

भारतीय संघाविरुद्धच्या वनडेसाठी ऑस्ट्रेलियन संघ

मिचेल मार्श (कर्णधार), जेवियर बार्टलेट, एलेक्स कॅरी, कूपर कोनोली, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, कॅमरुन ग्रीन, जोश हेज़लवुड, ट्रॅविस हेड, जोश इंग्लिस, मिचेल ओवेन, मॅथ्यू रेनशॉ, मॅथ्यू शॉर्ट, मिचेल स्टार्क, एडम झम्पा

भारतीय संघाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघ (पहिल्या दोन सामन्यासाठी)  

मिचेल मार्श (कर्णधार), सीन एबॉट, जेवियर बार्टलेट, टिम डेविड, बेन ड्वार्शुइस, नॅथन एलिस, जोश हेजलवुड, ट्रॅविस हेड, जोश इंग्लिस, मॅथ्यू कुहनेमन, मिचेल ओवेन, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोयनिस, एडम झम्पा

कधी अन् कुठं खेळवण्यात भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेतील सामने (India vs Australia ODI Series Schedule)

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया- पहिला एकदिवसीय सामना- १९ ऑक्टोबर, पर्थभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया- दुसरा एकदिवसीय सामना- २३ ऑक्टोबर, एडिलेडभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया- तिसरा एकदिवसीय सामना- २५ ऑक्टोबर, सिडनी

कधी अन् कुठं खेळवण्यात येणार टी-२० मालिकेतील सामने? (India vs Australia T20I Series Schedule)

  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया- पहिला टी२० सामना- २९ ऑक्टोबर, कॅनबेरा
  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया- दुसरा टी२० सामना- ३१ ऑक्टोबर, मेलबर्न
  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया- तिसरा टी २० सामना- २ नोव्हेंबर , होबार्ट
  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया- चौथा टी २० सामना- ६ नोव्हेंबर, गोल्ड कोस्ट
  • भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया- पाचवा टी२० सामना- ८ नोव्हेंबर, ब्रिसबेन

 

English
हिंदी सारांश
Web Title : Marsh to Lead Australia Against India in ODI, T20 Series

Web Summary : Australia announced squads for ODI and T20I series against India. Marnus Labuschagne dropped from ODI squad; Matt Renshaw gets a chance. Mitchell Starc returns. Marsh will captain the ODI team, replacing injured Pat Cummins. Fixtures announced.
टॅग्स :भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा २०२५भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया