IND vs AUS : भारतात प्रेक्षकांना शांत करणं म्हणजे आपण टॉपवर असल्यासारखं वाटतं - मार्नस लाबूशेन

icc odi world cup 2023 : विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा पराभव करून ऑस्ट्रेलियानं सहाव्यांदा विश्वचषक जिंकला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 02:49 PM2023-11-20T14:49:09+5:302023-11-20T14:51:53+5:30

whatsapp join usJoin us
Australia' s Marnus Labuschagne said, sound of silence in India is a great sound as it means you are on top after  ind vs aus icc odi final clash  | IND vs AUS : भारतात प्रेक्षकांना शांत करणं म्हणजे आपण टॉपवर असल्यासारखं वाटतं - मार्नस लाबूशेन

IND vs AUS : भारतात प्रेक्षकांना शांत करणं म्हणजे आपण टॉपवर असल्यासारखं वाटतं - मार्नस लाबूशेन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वन डे विश्वचषक २०२३ चा फायनलचा सामना खेळवला गेला. कांगारूंनी सहाव्यांदा विश्वचषक जिंकत यजमानांना पराभवाची धूळ चारली. ट्रॅव्हिस हेडने तमाम भारतीयांच्या स्वप्नाचा चुराडा करून टीम इंडियाचा विजयरथ रोखला. भारताची पराभवाची दिशेने वाटचाल होताच प्रेक्षकांची खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये स्मशान शांतता पसरली. याबाबत ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लाबूशेनला विचारले असता त्याने ट्रॅव्हिस हेडसोबतचा संवाद सांगितला. 

ट्रॅव्हिस हेड (१३७) आणि मार्नस लाबूशेन नाबाद (५८) यांनी शानदार भागीदारी नोंदवली. शतकवीर लाबूशेनसोबतचा संवाद सांगताना लाबूशेनने सांगितले की, मी हेडसोबत याबद्दल बोलत होतो की, भारतात सामना होत असताना प्रेक्षक शांत बसणे ही चांगली गोष्ट असते, कारण खचाखच भरलेल्या स्टेडियममध्ये प्रेक्षक शांत झाल्यावर आपण टॉपवर असल्यासारखे वाटते.

ऑस्ट्रेलियाचा जग्गजेतेपदाचा षटकार  
अंतिम सामन्यात नाणेफेकिचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने गेला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना यजमान संघाला शुबमन गिलच्या (४) रूपात मोठा झटका बसला. त्यानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा (४७) आणि विराट कोहली (५४) यांनी डाव सावरला. पण ग्लेन मॅक्सवेलच्या षटकांत चुकीचा फटका मारून रोहित बाद झाला. ट्रॅव्हिस हेडने अप्रतिम झेल घेऊन हिटमॅनला बाहेरचा रस्ता दाखवला. दुसरीकडे विराट सावध खेळी करून भारताचा डाव पुढे नेत होता. अशातच ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्सने यजमानांना आणखी एक धक्का देत श्रेयस अय्यरला तंबूत पाठवले. मग विराट कोहली आणि लोकेश राहुल यांनी भारतीयांच्या आशा जिवंत ठेवल्या अन् भागीदारी नोंदवली. निर्धाव चेंडूमुळे दबाव वाढत गेल्याने भारत अडचणीत सापडला. त्यात विराटला नशिबाची साथ न मिळाल्याने बाहेर जावे लागले.  विराटने (५४) आणि राहुलने (६६) धावा करून ऑस्ट्रेलियासमोर सन्माजनक आव्हान उभारण्यात मोलाची भूमिका बजावली. अखेर भारतीय संघाने निर्धारित ५० षटकांत सर्वबाद २४० धावा केल्या. २४१ धावांचा पाठलाग करताना कांगारूंनी ट्रॅव्हिस हेडच्या (१३७) शतकी खेळीच्या जोरावर मोठा विजय मिळवला. 

Web Title: Australia' s Marnus Labuschagne said, sound of silence in India is a great sound as it means you are on top after  ind vs aus icc odi final clash 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.