Join us  

जेव्हा पंतप्रधान क्रिकेटपटूंसाठी स्वतः पाणी घेऊन मैदानावर उतरतात

श्रीलंकेचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे आणि त्यांच्यातील मालिका सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांनी गुरुवारी सराव सामना खेळला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 7:41 PM

Open in App

श्रीलंकेचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे आणि त्यांच्यातील मालिका सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांनी गुरुवारी सराव सामना खेळला. पंतप्रधान एकादश आणि श्रीलंका यांच्यातील ट्वेंटी-20 सामन्यांत पंतप्रधान एकादश संघाने एक विकेट राखून थरारक विजय मिळवला. पण, या सामन्यात एक प्रसंग असा घडला की त्यानं सर्वांची मनं जिंकली. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरीसन हे चक्क आपल्या खेळाडूंसाठी पाणी घेऊन मैदानावर उतरले. खेळाडूंसह स्टेडियमवर उपस्थित प्रेक्षकांनी मॉरीसन यांच्या या कृतीचे कौतुक केले. श्रीलंकेच्या डावातील 16व्या षटकात मॉरीसन अचानक पाणी घेऊन मैदानावर आले. मॉरीसन यांच्या या कृतीनं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. मॉरीसन हे पिवळी कॅप घालून मैदानावर दाखल झाले. 

प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेने 8 बाद 131 धावा केल्या. श्रीलंकेच्या ओशादा फर्नांडो ( 38), वनिंदू हसरंगा ( 26) आणि भानुका राजपक्षा ( 24) यांनी उल्लेखनीय खेळी केली. प्रत्युत्तरात पंतप्रधान एकादश संघाने सुरुवात दणक्यात केली, परंतु त्यांना विजयासाठी संघर्ष करावा लागला. सलामीवीर हॅरी नाएलसन ( 79) याने एकाकी खिंड लढवली. एकादश संघाने 19.5 षटकांत 9 बाद 132 धावा करून विजय मिळवला.

 

टॅग्स :आॅस्ट्रेलियाश्रीलंका