IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!

India U19 vs Australia U19: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सप्टेंबर महिन्यात वनडे आणि टेस्ट मालिका रंगणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2025 17:11 IST2025-08-08T17:10:13+5:302025-08-08T17:11:34+5:30

whatsapp join usJoin us
Australia name two Indian origin boys in U19 mens squad for series against India U19 | IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!

IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंग्लंडचा यशस्वी दौरा पूर्ण करून भारतीय अंडर १९ संघ नुकताच मायदेशी परतला आहे. आता त्यांना सप्टेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियामध्ये पुढील मालिका खेळायची आहे. या दौऱ्यात टीम इंडिया यजमान संघाविरुद्ध तीन यूथ वनडे मालिका आणि दोन चार दिवसीय यूथ कसोटी मालिका खेळेल. भारताच्या दौऱ्याला २१ सप्टेंबरपासून सुरू होईल. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या या मालिकेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे, ज्यामध्ये भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंचाही समावेश आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्धच्या अंडर-१९ मालिकेसाठी जाहीर केलेल्या १५ सदस्यीय संघात भारतीय वंशाच्या आर्यन शर्मा आणि यश देशमुख यांना स्थान मिळाले.संघ जाहीर करण्यासोबतच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नवीन प्रशिक्षकाचे नाव देखील जाहीर केले आहे, ज्यामध्ये २००७ ते २०११ पर्यंत ऑस्ट्रेलियाच्या वरिष्ठ पुरुष संघाचे प्रशिक्षक असलेले टिम निल्सन आता अंडर-१९ संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून आपली नवीन इनिंग सुरू करतील.

भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा अंडर-१९ संघ
सायमन बज, अ‍ॅलेक्स टर्नर, स्टीव्ह होगन, विल मलाजचुक, यश देशमुख, टॉम होगन, आर्यन शर्मा, जॉन जेम्स, हेडन शिलर, चार्ल्स लॅचमंड, बेन गॉर्डन, विल बायरम, केसी बार्टन, अ‍ॅलेक्स ली यंग, जेडेन ड्रेपर. राखीव खेळाडू - जेड हॉलिक, टॉम पॅडिंग्टन, ज्युलियन ऑसबोर्न.ल.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा अंडर-१९ संघ
आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा (उपकर्णधार), वैभव सूर्यवंशी, वेदांत त्रिवेदी, राहुल कुमार, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंश सिंग (विकेटकीपर), आर.एस. अंबरीश,  कनिष्क चौहान, नमन पुष्पक, हेनिल पटेल, डी. दीपेश, किशन कुमार, अनमोलजीत सिंह, खिलान पटेल, उधव मोहन, अमन चौहान. राखीव खेळाडू- युद्धजीत गुहा, लक्ष्मण, बी.के. किशोर, अलंकृत रापोले, अर्नव बुग्गा.

Web Title: Australia name two Indian origin boys in U19 mens squad for series against India U19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.