Join us  

भारतीय क्रिकेट संघाला मिळालं २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेचं तिकिट; रंगणार India vs Pakistan चा थरार

बर्मिंगहॅम येथे पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेतून ( Birmingham 2022 Commonwealth Games ) क्रिकेटचे पुनरागमन होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 4:52 PM

Open in App

बर्मिंगहॅम येथे पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेतून ( Birmingham 2022 Commonwealth Games ) क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) सोमवारी या स्पर्धेसाठी पात्र ठरलेल्या सहा संघांची घोषणा केली. ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांनी या स्पर्धेचं तिकिट पक्कं केलं आहे, तर यजमान म्हणून इंग्लंडचा संघ आधाच पात्र ठरला आहे. २८ जुलै ते ८ ऑगस्ट २०२२ या कालावधीत राष्ट्रकुल स्पर्धा खेळवण्यात येणार आहे.  Pat Cummins चे कोरोनाविरुद्धच्या लढ्यात मोठं योगदान; ऑक्सिजन खरेदीसाठी PM Cares Fund ला दिले ३० लाख!

१९९८च्या क्वालालम्पूर राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुषांचे वन डे सामने खेळवण्यात आले होते आणि त्यात दक्षिण आफ्रिकेनं बाजी मारली होती. यंदा महिला क्रिकेटचा समावेश राष्ट्रकुल स्पर्धेत करण्यात आला आहे. आठ संघांमध्ये ट्वेंटी-२० सामने खेळवण्यात येणार आहेत. आयसीसीच्या महिला ट्वेंटी-२० टीम गुणतालिकेनुसार अव्वल सहा संघांनी राष्ट्रकुल स्पर्धेतील प्रवेश निश्चित केला आहे. वेस्ट इंडिज विभागातून संघ पात्रता फेरीतून उर्वरित दोन संघ प्रवेश करतील. राष्ट्रकुल स्पर्धेत वेस्ट इंडिजचा संघ खेळणार नाही, कारण कॅरेबिनय देशांतून प्रत्येक संघ येथे सहभागी होत असतो. त्यामुळे फक्त आयसीसीच्या स्पर्धांमध्ये वेस्ट इंडिजचा संघ खेळतो. Abhinav Bindra : बबलमध्ये राहून क्रिकेटपटू आंधळ्या-बहिऱ्यांसारखे वागू शकत नाही; अभिनव बिंद्रानं IPLवर साधला निशाणा

भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली,''राष्ट्रकुल स्पर्धेतील प्रवेश निश्चित केल्याचा आनंद आहे. गतवर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या आसीसी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत आम्ही प्रवेश केला होता आणि तोच आत्मविश्वास पुढे नेत आम्ही राष्ट्रकुल स्पर्धेत दमदार कामगिरी करण्यासाठी सज्ज आहोत.''   

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघमहिला टी-२० क्रिकेट