Join us  

सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी युवराज सिंग, वासीम अक्रम एकत्र खेळणार!

ऑस्ट्रेलियातील जंगलाला लागलेल्या आगीत वन्यसृष्टीचे प्रचंड नुकसान झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2020 11:58 AM

Open in App

ऑस्ट्रेलियातील जंगलाला लागलेल्या आगीत वन्यसृष्टीचे प्रचंड नुकसान झाले. अनेक मुक्या जिवांना प्राण गमवावे लागले. आगीनंतर येथील निसर्गसौंदर्य बेचिराख झाले आहे आणि ते पुन्हा नव्यानं उभं करण्याचं आव्हान ऑस्ट्रेलिया सरकारसमोर आहे. अशाच विविध क्षेत्रातुन पुनर्वसनासाठी मदतीचा ओघ सुरूच आहे. यासाठी ऑस्ट्रेलियाचे दिग्गज शेन वॉर्न आणि रिकी पाँटिंग यांनी क्रिकेट सामन्यांचे आयोजन केले आहे. भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज कर्टनी वॉल्श अनुक्रमे पाँटिंग व वॉर्न यांच्या संघाच्या प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 

ऑस्ट्रेलिया आग : पुनर्वसनासाठी टीम इंडियाचा पुढाकार, केली लाखोंची मदत

ऑस्ट्रेलिया आग : 'क्रिकेटचा देव' सचिन तेंडुलकर मदतीला धावला, दिसणार मोठ्या भूमिकेत

आता या सामन्यात भारताचा सुपरस्टार युवराज सिंग आणि पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज वासीम अक्रम हेही खेळणार आहेत. या सामन्यात खेळण्याचे निश्चित करणारे हे पहिलेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहेत. 8 फेब्रुवारीला हा सामना होणार आहे. त्यांच्याशिवाय जस्टीन लँगर आणि मॅथ्यू हेडन हेही खेळणार आहेत. या सामन्यातून उभा राहणारा निधी ऑस्ट्रेलिया आगीत नष्ट झालेल्या निसर्गसौंदर्याच्या पुनर्वसनासाठी वापरण्यात येणार आहे.  

युवराजच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर टीम इंडियानं 2011चा वन डे वर्ल्ड कप जिंकला. शिवाय त्यानं 2007च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमध्ये इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडला एकाच षटकात मारलेले सहा षटकार अजूनही कोणी विसरलेले नाही. पाकिस्तानचा अक्रम हा महान गोलंदाजांपैकी एक आहे. त्यानं 104 कसोटीत 415, तर 356 वन डे सामन्यांत 502 विकेट्स घेतल्या आहेत.   

ऑस्ट्रेलिया भीषण आग : फलंदाजानं उभारली एका सामन्यातून सव्वा लाखांची मदत

....म्हणून लोकांना न्यूड फोटो पाठवून पैसे मागू लागली ही प्रसिद्ध मॉडेल, ८ कोटी केले जमा!

ऑस्ट्रेलिया आगः शेन वॉर्नच्या 'त्या' टोपीवर 4.9 कोटींची बोली, संपूर्ण रक्कम पुनर्वसनासाठी

या सामन्यात कोण कोण खेळणार?शेन वॉर्न, रिकी पाँटिंग, अॅडम गिलख्रिस्त, अॅलेक्स ब्लॅकवेल, अँड्य्रू सायमंड, ब्रॅड फिटलर, ब्रॅड हॅडीन, ब्रेट ली, एलिसे व्हिलानी, ग्रेस हॅरीस, जस्टीन लँगर, ल्युक हॉज, मॅथ्यू हेडन, मिचेल क्लार्क, माइक हस्सी, फोएबे लिटचफिल्ड, शेन वॉटसन, युवराज सिंग, वासीम अक्रम ( अजून नावं येतील)  

टॅग्स :ऑस्ट्रेलिया भीषण आगयुवराज सिंगवसीम अक्रमसचिन तेंडुलकर