Join us  

World Cup 2023 Final मध्ये ऑस्ट्रेलिया ४५० धावा करणार अन् भारताला ६५ धावांवर गुंडाळणार

भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२३ मध्ये वन डे वर्ल्ड कप होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ यंदाही जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांमध्ये आघाडीवर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2023 5:33 PM

Open in App

भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२३ मध्ये वन डे वर्ल्ड कप होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ यंदाही जेतेपदाच्या प्रबळ दावेदारांमध्ये आघाडीवर आहे. पण, ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श याने मोठं भाकीत केलं आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या मार्शने World Cup final 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ ३८५ धावांनी भारतावर विजय मिळवेल असे भाकीत केलं आहे.  

विराट कोहली-गौतम गंभीर बंगळुरूत ४५ मिनिटे एकमेकांशी बोलले अन् लखनौमध्ये येऊन भांडले

ऑस्ट्रेलियाने १९८७, १९९९, २००३, २००७ आणि २०१५ मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकला आहे, सर्वाधिक पाच वन डे वर्ल्ड कप जिंकणारा तो एकमेव संघ आहे. ३१ वर्षीय मार्शने भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात फायनल होईल असा दावा केलाय.. तो म्हणाला, आम्ही फायनलमध्ये २ बाद ४५० धावा करून आणि भारताचा संपूर्ण संघ ६५ धावांवर गुंडाळू... ऑस्ट्रेलिया या स्पर्धेत अपराजित राहणार.

२००३ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वन डे वर्ल्ड कपची फायनल जोहान्सबर्ग येथे झाली होती आणि रिकी पाँटिंगच्या अफलातून फटकेबाजीने कांगारू जिंकले होते. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत २ बाद ३५९ धावा केल्या होत्या. पाँटिंगने १२१ चेंडूंत ४ चौकार व ८ षटकारांच्या मदतीने १४० धावांची खेळी केली होती. डॅनिएल मार्टीनने ८८ धावा करताना पाँटिंगसह २३४ धावांची भागीदारी केली. 

ऑस्ट्रेलियाने ३९.२ षटकांत भारताला २३४ धावांत गुंडाळले. विरेंद्र सेहवागने एकट्याने खिंड लढवताना ८१ चेंडूंत १० चौकार व ३ षटकारांसह ८२ धावा केल्या होत्या. राहुल द्रविडने ५७ चेंडूंत ४७ धावा केल्या होत्या. ग्लेन मॅक्ग्राथने तीन विकेट्स घेतलेल्या. 

टॅग्स :आयसीसीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
Open in App