Join us  

Steve Smith, AUS vs WI Test: स्टीव्ह स्मिथचे झंझावाती द्विशतक; Sachin Tendulkar चा 'हा' विक्रम मोडला

स्मिथने ठोकल्या नाबाद २०० धावा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2022 1:57 PM

Open in App

Steve Smith, AUS vs WI Test: स्टीव्ह स्मिथने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात शानदार द्विशतक झळकावले. त्याचे कसोटी कारकिर्दीतील हे २९वे शतक ठरले. तर मार्नस लाबूशेनने देखील द्विशतकी खेळी केली. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेत लाबूशेनने २०४ तर स्मिथने नाबाद २०० धावांची खेळी केली. दोघांनी तुफान फटकेबाजी करत संघाला मोठी धावसंख्या गाठून दिली. ५९८ धावांवर ऑस्ट्रेलियाने पहिला डाव घोषित केला. महत्त्वाची बाब म्हणजे, स्टीव्ह स्मिथने या दमदार द्विशतकी खेळीच्या जोरावर सर डॉन ब्रॅडमन यांच्या विक्रमाशी बरोबरी साधली, तर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडीत काढला.

स्टीव्ह स्मिथने डॉन ब्रॅडमनच्या २९ कसोटी शतकांच्या विक्रमाची बरोबरी केली. स्मिथचे २९वे शतक त्याच्या १५५व्या कसोटी डावात केले. अशाप्रकारे, सर्वात कमी डावात सर्वात जलद २९ शतके करणारा तो ब्रॅडमन आणि सचिननंतरचा तिसरा फलंदाज ठरला. स्टीव्ह स्मिथने घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध शतक ठोकून आपल्या ४००० धावा पूर्ण केल्या.

या दरम्यान त्याची फलंदाजीची सरासरी ६४.७७ राहिली. स्मिथने सचिनपेक्षा कमी डावात २९ कसोटी शतके झळकावली नसतील, तरीही देशांतर्गत कसोटीत ४००० हून अधिक धावा करताना त्याची सरासरी सचिन तेंडुलकरच्या ५२.६७ पेक्षा चांगली दिसली. सचिनने देशांतर्गत कसोटीत ७,२१६ धावा केल्या आहेत. यादीत देशांतर्गत कसोटीत ७,५७८ धावांचा विक्रम रिकी पाँटिंगच्या नावावर आहे. स्टीव्ह स्मिथपेक्षा फक्त डॉन ब्रॅडमन (९८.२२) आणि गॅरी सोबर्स (६६.८०) यांची फलंदाजी सरासरी चांगली आहे. ज्यांनी घरच्या कसोटीत ४००० धावा केल्या आहेत.

दरम्यान, मार्नस लाबूशेन आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या द्विशतकी खेळींव्यतिरिक्त ट्रेव्हिस हेडने ९९ धावांची खेळी केली. त्याचे शतक एका धावेने हुकले. तर उस्मान ख्वाजाने ६५ धावांची खेळी केली.

टॅग्स :स्टीव्हन स्मिथसचिन तेंडुलकरसर डॉन ब्रॅडमनआॅस्ट्रेलियावेस्ट इंडिज
Open in App